Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोना मुळे बीजमाता राहीबाई पोपेरे यांची बीजबँक काही दिवस बंद

Share
कोरोना मुळे बीजमाता राहीबाई पोपेरे यांची बीजबँक काही दिवस बंद, Latest News Corona Problems Rahibai Seeds Bank Close Akole

अकोले(प्रतिनिधी)- जगभर आणि देशात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस मुळे सर्वत्र काळजी घेतली जात असताना शासनाच्या आदेशाचे पालन आणि गर्दी टाळण्यासाठी बीजमाता राहीबाई पोपेरे यांनीही पुढाकार घेतला आहे. शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कोंभाळणे येथील गावरान बियांची बँक अभ्यासक, शेतकरी, विद्यार्थी या सर्वांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना सर्वानी खबरदारी घेतली पाहिजे म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे. गावरान बियाणे बहुतेक भागातून हद्दपार झाल्यामुळे मोठा ओघ कोंभाळणे बीजबँकेकडे येत आहे. देश आणि राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक बीजबँक पाहण्यासाठी आणि बियाणे खरेदी करण्यासही येत आहेत.

राहीबाई यांना भारत सरकारचा पद्मश्री किताब जाहीर झाल्यापासून त्यांना भेटायला येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!