Saturday, April 27, 2024
Homeनगरगुढीपाडव्याच्या गोडव्याला कोरोनाचा ‘संसर्ग’

गुढीपाडव्याच्या गोडव्याला कोरोनाचा ‘संसर्ग’

नगर शहरात संचार बंदी : नागरिकांचे वास्तव्य घरात

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाडव्याच्या गुढीसाठी लागणारी गाठी बाजारात आली तरी खरेदी करायला नगरकर घराबाहेर पडण्यास घाबरले आहेत. शहरात सगळीकडेच संचारबंदी असून त्यात ‘प्रसाद’ मिळेल अशी भिती नगरकरांना आहे. चितळे रोडवर मंगळवारी गाठी विक्री करणारे काही दुकाने हातगाड्यावर लागली आहेत. मात्र त्या खरेदीसाठी ग्राहकच नसल्याचे चित्र आहे. यामुळे पाडव्याच्या गोडव्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसते आहे.

- Advertisement -

गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने लोकांची नवीन वस्तू खरेदीची मोठी झुंबड असते. नववर्षामुळे सर्वजण उत्साहात असतात. मात्र, यंदा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचार बंदी लागू आहे. यामुळे फुले, बत्तासे, तोरणे आणण्यासाठी लोकांना घरा बाहेर पडता येत नाही. त्यामुळे बाजारात शुकशुकाट पहायला मिळत असून व्यावसिकांना याचा फटका बसला आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. नगरमध्ये कोरोनाचे दोन रूग्न पॉझिटीव्ह आहेत. तसेच राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगभरात करोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. भारतातही करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोना बाधित आढळून आले आहेत. देशातील परिस्थितीमुळे अनेक ठिकाणची मंदिरे बंद आहे. गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणार्‍या शोभायात्रा, ठिकठिकाणी असलेल्या ग्रामदेवतांच्या यात्रा-जत्रा स्थगित करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या