Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरमध्ये आणखी 3 पॉझिटिव्ह ; लोणीमधील एकाचा समावेश

Share
अकोले : धामणगाव पाट येथे करोना बाधित सापडला, Latest News Akole Dhamangav Pat Corona Positive
मुकुंदनगरमधील दोघे तर लोणीमधील एकाचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सरकारी रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या 73 कोरोना संशयीतांच्या स्त्राव चाचणी नमुन्यांपैकी सर्व संशयीतांचे अहवाल शनिवारी रात्री उशीरापर्यंत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात नगर शहरातील मुकूंदनगरच्या दोघांचा समावेश असून राहाता तालुक्यातील लोणी परिसरातील एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता 20 झाली आहे.
शनिवारी सकाळी संशयीत कोरोना बाधीत 73 व्यक्तींचे घशातील स्त्राव घेऊन ते पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. यात राहाता तालुक्यातील कोल्हार, शेवगाव आणि श्रीगोंदा येथील व्यक्तींचा समावेश होता. शनिवारी सकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने 479 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 456 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 20 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात 110 जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 380 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर 240 व्यक्तींनी त्यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्याची माहित डॉ. मुरंबीकर यांनी दिली.
संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणीसाठी येणार्‍या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वताच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन, जिल्हा प्रशसनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्व बाधीत ठणठणीत
जिल्ह्यात शनिवारपर्यंत 17 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात दोघांवर 14 दिवस उपचार करून त्यांना 14 दिवस विलग ठेवून त्यांची 14 दिवसानंतर दोन चाचणी करून तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलेले आहेत. यासह आधीचे 15 आणि शनिवारी सायंकाळी सापडलेल्या बाधीत अशा 16 रुग्णाची प्रकृती चांगली असून ते परदेशीवारी, परदेशी व्यक्ती आणि हायरिस्कच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आरोग्य यंत्रणेच्यावतीने सांगण्यात आले.
कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये नगर शहरातील मुकुंदनगरमधील एक व्यक्ती 76 वर्षीय तर दुसरी 35 वर्षीय आहे. तर राहाता तालुक्यातील लोणी येथील व्यक्ती 46 वर्षीय आहे.

दुसरा बाधित नेवाशाचा रुग्ण कोरोनामुक्त

14 दिवस घरीच देखरेखीखाली

जिल्ह्यात आढळलेल्या दुसर्‍या नेवासा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य यंत्रणेच्या तपासणी नंतर त्याला घरी सोडण्यात आले. यावेळी बूथ हॉस्पिटलचा डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणखी 14 दिवस त्याला देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

आरोग्य यंत्रणेच्या सकारात्मक प्रयत्नामुळे आणि योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला. इतर रुग्णावर आपण चांगले उपचार करीत आहोत, त्यामुळे तेही निश्चितपणे बरे होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. त्या रुग्णावर उपचार करणार्‍या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांचे श्री. द्विवेदी यांनी कौतुक करत आभार मानले.

नेवासे तालुक्यातील या व्यक्तीला 17 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परदेशातून परत आल्यानंतर त्याला त्रास जाणऊ लागल्याने त्याचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही कडे पाठवले होते. त्या अहवालानंतर त्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तात्काळ त्याला बूथ हॉस्पिटल येथे आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते.

2 एप्रिल रोजी 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला. तो अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा दुसरा स्त्राव चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण कोरोनातून बरा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या 17 झाली आहे. त्यातील 2 रुग्ण आता बरे होऊन घरी गेले आहेत तर उर्वरित 15 जणांवर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचर सुरू आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!