Friday, April 26, 2024
Homeनगरचौघा करोना बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार

चौघा करोना बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार

जामखेडचा आणखी एक करोनामुक्त : 42 रुग्णांची मात

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील करोनाबाधीत 17 रुग्णांपैकी चौघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी जामखेडमधील आणखी एकाची करोनातून मुक्तता झाली असल्याने त्याला बुथ हॉस्पिटलमधून तालुका पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

- Advertisement -

जिल्ह्यात आतापर्यंत 62 लोकांना करोनाची लागण झालेली आहे. यासह बीड जिल्ह्यातील एक आणि मुंबईच्या पोलीसांची पत्नी अशा दोघांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, दोघे रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याने त्यांची नोंद

त्यात्या जिल्ह्यात घेणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेवून करोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यात 62 करोना पॉझिटिव्ह पैकी 42 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. उर्वरित 17 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील चौघांवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहे. तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

मुळचे नगरचे आणि मुंबईतील रहिवासी बीडमध्ये पॉझिटिव्ह

बीड – मुंबई (चेंबूर) येथून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आलेल्या आलेले एकाच कुटुंबातील 7 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे बीडच्या करोनाबाधितांची संख्या आता 9 झाली आहे.

मूळचे नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा येथील रहिवासी असलेले कुटुंब मुंबईहून थेट आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले. 14 तारखेला आल्यानंतर त्यांना शेतात क्वारंटाईन केले. 2 दिवसांपासून त्यांना लक्षणे जाणवू लागली. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पथक पाठवून या कुटुंबाला जिल्हा रुग्णालयात आणले. शनिवारी रात्री त्यांचा स्वॅब घेतला. यामध्ये 7 ही लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बीडमध्ये पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण हे मुळचे नगर जिल्ह्यातील असले तरी ते मुंबईत वास्तव्यासह होते. त्यांच्या आधारवर मुंबईचा पत्ता असून त्याचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे ते मुंबईहून थेड बीडला गेले होते. त्यांनी नगरला प्रवास केलेला नसल्याचे नगर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

राहाता, संगमनेर, नगरला दिलासा
शनिवारी रात्री उशीरा 8 करोना संशयीतांचे अहवाल तपासणीसाठी पुण्याच्या लष्काराच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविले होते. यातील सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरित दोन अहवालाची प्रतिक्षा आहे. यात राहाता, संगमनेर आणि नाशिकच्या प्रत्येकी एकाचा तर उर्वरित नगर ग्रामीण मधील तिघांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांपैकी 1 हजार 729 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. करोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 38 ठिकाणी क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली असून त्या ठिकाणी 1 हजार 930 खांटा उपलब्ध आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या