Friday, April 26, 2024
Homeनगरनेवासा – भानसहिवरेतील वृद्ध व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न

नेवासा – भानसहिवरेतील वृद्ध व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील भानसहिवरा येथील एक वृद्ध व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचे संपर्कातील 4 व्यक्तींना तपासणी साठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील वृद्ध व्यक्तीला व्यक्ती श्वसन संस्थेच्या तक्रारीमुळे तालुक्यातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. तपासणी नंतर डॉक्टरांनी त्यांना निमोनिया असल्याचे सांगून पुढील उपचारासाठी दुसर्‍या मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. परंतु या वृद्ध व्यक्तीचा नातू पुणे येथे राहत असल्याने या वृद्ध रुग्णाला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ससून मध्ये तपासणीनंतर त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. तशी माहिती काल सोमवार दि.1 जून रोजी ससून रुग्णालयाचे यंत्रणेने अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिला.

- Advertisement -

त्यानुसार या वृद्ध व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या भानसहिवरा येथील 4 व्यक्ती तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांच्यासह कुकाणा आणि भानसहिवरा येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर,कर्मचारी यांनी भानसहिवरा येथे संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन चार व्यक्तींना नगर येथे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले.

असे लक्षात येत आहे की,एक ठराविक कालावधी लोटला तरी सुद्धा केसेस पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढतच आहेत. त्यामुळे सर्व गावकरी,बाहेर गावावरून आलेल्या व्यक्ती यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.काही लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.

डॉ.अभिराज सूर्यवंशी
तालुका आरोग्य अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या