Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोरोनाबाधीत त्या पहिल्या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह

कोरोनाबाधीत त्या पहिल्या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह

आज सकाळी तपासणीनंतर कोरोना मुक्त असल्याची घोषणा करणार : जिल्ह्यात 374 होम क्वॉरंटाइन

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात परदेशवारीवरून आलेल्या त्या पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. रविवारी सकाळी त्या रुग्णाची वैद्यकीय तपासणी करून संबंधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या रुग्णाला घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सार्वमतशी बोलातांना दिली.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात परदेशातून आलेल्या आणि कोरोना बाधीतांच्या सानिध्यात आलेल्या मात्र कोरोनाबाधीत नसलेले 374 नागरिकांना होम क्वॉरंटईन करून घरात ठेवण्यात आलेले आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने परजिल्ह्यातून आलेल्या प्रत्येेक तालुक्यातील हजारो व्यक्तींच्या हातावर तालुका पातळीवर शिक्के मारून त्यांना 14 दिवस घरात नजर कैद केलेले आहे. तसेच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्यास त्यांना तातडीने सरकारी आरोग्य सेवेशी संपर्क करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधेच्या संशयावरून 269 व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले.

त्यापैकी 250 व्यक्तींचे नमुने हे निगेटिव्ह आलेले असून यात सहा नमुने रिजेक्ट करण्यात आले आहेत, तर तिन व्यक्तींचे नमुने कोरोनाबाधीत आले होते. यातील पहिल्या रुग्णांचा नमुना बाधीत आल्यानंतर 14 दिवसांनी घेतलेला पहिला नमुना निगेटिव्ह आल्यानंतर 24 तासांनी दुसरा नमुना घेण्यात आला. हा नमुना देखील निगेटिव्ह आला आहे. यामुळे हा रुग्ण कोरोना मुक्त झाला असून रविवारी सकाळी संबंधीत रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्याला कोरोनामुक्त असल्याचे घोषीत करून घरी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या