Friday, April 26, 2024
Homeनगर36 करोना रुग्ण ठणठणीत 22 अहवालांची प्रतीक्षा

36 करोना रुग्ण ठणठणीत 22 अहवालांची प्रतीक्षा

नेवाशातील एकाला डिस्चार्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नेवासा येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला रविवारी सायंकाळी बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कारोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 36 झाली आहे. जिल्ह्यात करोना बाधित व्यक्तींची संख्या 53 असून त्यापैकी आता 14 जणांवर उपचार सुरू असून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. तसेच 22 अहवाल प्रतिक्षा असल्याचे सांगितले.

- Advertisement -

नेवासा येथील रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला काल डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बूथ हॉस्पिटलचा डॉक्टर्स, नर्सेस यांनी रुग्णाला निरोप देऊन आरोग्य चांगले राखण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या रुग्णानेही त्याच्यावर चांगले उपचार आणि योग्य काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफचे आभार मानले.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 745 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 639 स्त्राव निगेटिव्ह आले तर 53 व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.आता 36 व्यक्ती बर्‍या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या 13 रुग्ण बूथ हॉस्पिटल मध्ये तर 1 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. कोपरगाव, जामखेड आणि धांदरफळ येथील तिघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या 22 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. यातील बहुतांशी अहवाल हे संगमनेर तालुक्यातील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या