Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकरोनाचा प्रसार होण्यात चीनचे वुहान शहर हे एक मोठे कारण – जागतिक...

करोनाचा प्रसार होण्यात चीनचे वुहान शहर हे एक मोठे कारण – जागतिक आरोग्य संघटना

दिल्ली – करोना विषाणूचा प्रसार होण्यात चीनचे वुहान शहर हे एक मोठे कारण बनले आहे.चीन आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने अखेर यावर आपले मत मांडले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे खाद्य सुरक्षा ज्युनोटिक व्हायरस तज्ज्ञ डॉ. पीटर बेन अंब्रेक यांनी शुक्रवारी जिनिव्हा येथे पत्रकार परिषद घेत सांगितले की वुहानच्या बाजारपेठेची यामध्ये भूमिका आहे, हे स्पष्ट आहे. परंतु यात अधिक काय भूमिका आहे? याबाबत अधिक संशोधन आवश्यक आहे. ते म्हणाले की हा विषाणू या शहरात कोठून आला आहे किंवा विषाणू या बाजारपेठेत निर्माण झाला गेला हा संशोधनाचा विषय आहे. परंतु हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये शहराची भूमिका आहे. तसेच याबाबत अधिक संशोधन चालू असल्याचेही मत त्यांनी मांडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या