Friday, April 26, 2024
Homeनगरकोरोनामुळे चिकनचे दर 50 रुपये किलोने ढासळले

कोरोनामुळे चिकनचे दर 50 रुपये किलोने ढासळले

कुक्कुटपालन करणारे शेतकरी, उद्योजक अडचणीत; रिटेल विक्री करणार्‍यांची देखील मनमानी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुळेे कुक्कुटपालनाला लागलेले अफवांचे ग्रहण अधिकच गडद झाले आहे. मांसाहाराने कोरोना होतो, अशा अफवा पसरल्यानंतर चिकनचे कोसळणारे दर सावरलेले नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन व त्या संलग्न शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. करोनाचा प्रभावामुळे राज्यात चिकनची मागणी घटली. नगर जिल्ह्यातील चिकन विक्रीचा दर 50 रुपयांनी कमी झाला आहे.
करोनाच्या अफेवेमुळे राज्यात कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने याचे 150 कोटींचे नुकसान झाले.

- Advertisement -

सोशल मीडियावर कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषगांने कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय माहिती पसरविली गेली. यामुळे राज्यात चिकनचा तीन ते साडेतीन हजार कोटी टन असलेला खप कमी होऊन तो दोन हजार टनांवर आला. राज्यात जवळपास दररोज 10 ते 11 कोटींचा फटका बसत असल्याचे पशूसंवर्धन विभागाने यापूर्वीच जाहीर केले.

या संदर्भात पशूसंवर्धन विभागाकडे माहितीबाबत विचारणा केली असता, जिल्ह्यात कुक्कटपालनाची कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले. 2012 ला झालेल्या जिल्ह्यातील पशूगणनेत जिल्ह्यातील कुक्कटपालन करणार्‍या फार्मची माहिती घेण्यात आलेली नाही. यासह 40 दिवसात बॉयलर कोंडीची स्थलांतर होत असल्याने एकदा घेतली माहितीत बदल होत असल्याचे पशूसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्ह्यात शेतकर्‍यांकडे 79 लाख कोंबड्या (पक्षी) आहे. तर जिल्ह्यात अंदाजे 20 ते 25 लाख बॉयलर कोंबड्या असून त्यांची विक्री ही मुंबईला करार पध्दतीसोबत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असणार्‍या रिटेलर मासंविक्रेत्यांमार्फत होत आहे.

जिल्ह्यात दररोज 10 ते 12 टन बॉयलर कोंबड्याच्या मांसाची विक्री होते. कोरोनच्या अफवेमुळे मुंबई मार्केट आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विक्रीवर मोठा परिणाम झाला. आधी 100 ते 110 रुपये प्रती किलो दराने विक्री होणारे बॉयलरचे दर आता 50 ते 60 रुपये किलोपर्यंत खाली आल्याचा दावा पशूसंवर्धन विभागातील सुत्रांनी केला आहे. तर हा दर सध्या 30 ते 35 रुपये प्रती किलो असल्याचे कुक्कटपालन व्यवसाय करणार्‍या शेतकरी-व्यापार्‍यांकडून सांगीतले जात आहे.

कोरोनासोबत ग्रामीण भागात मनमानी पध्दतीने बॉयलर मासंविक्री करणारे रिटेलरही जबाबदार असल्याचा आरोपही होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात किती ठिकाणी किती कुक्कुटपालन करणारे शेतकरी, व्यापारी आहेत. त्यांच्या फार्मची संख्या त्यात तयार होणार्‍या बॉयलर कोंबड्या आणि त्यांची दररोज अथवा महिन्यांला होणारी विक्री, त्याची मासिक उलाढाल, आदीची कोणतीच माहिती पशूसंवर्धन विभागाकडे नाही. यामुळे जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकला चिकन फेस्टीवल
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असून, एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीस संक्रमित होतो. तथापि, कुक्कुट पक्ष्यांमधील कोरोना विषाणू (इन्फेक्शस ब्राँकायटीस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये विषाणू संक्रमित झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटण उकळून-शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. तरी ग्राहकांनी सोशल मीडिया-फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमातील विपर्यास केलेली माहिती, बातम्या, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय थोरे केले आहे. तसेच नाशिकला कोरोना विषयी निरसन करण्यासाठी खासगी पोल्ट्री संघटनेने 25 ते 28 फेबु्रवारी दरम्यान चिकन फेस्टीवल आयोजित केले असल्याची माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या