Friday, April 26, 2024
Homeनगरवादग्रस्त झुम अ‍ॅपव्दारे अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन प्रशिक्षण

वादग्रस्त झुम अ‍ॅपव्दारे अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन प्रशिक्षण

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे आदेश; 24 तारखेपासून कोरोना विरूध्द धडे गिरविणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने वादग्रस्त ठरविलेल्या झुम अ‍ॅपव्दारे जिल्ह्यातील 5 हजार 321 अंगणवाडी सेविकांना येत्या 24 तारखेपासून कोरोना विरोधात लढा उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने याबाबतचे आदेश काढले असून त्यानुसार हे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोरोना विरोधातील लढा तिव्र करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. याबाबतचे आदेश आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे आदेश यांनी विभागातील सर्व आरोग्य अधिकारी यांना काढले आहेत. यात कोरोना विरोधात लढा देण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी घ्यावयाची काळजी याचे प्रशिक्षण आरोग्य विभागाकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे.

या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ज्या अंगणवाडी सेविकांकडे ऑनराईड मोबाईल नाहीत, त्यांना नजिकच्या प्राथमिक उपकेंद्रात बोलावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रशिक्षण देण्याच्या सुचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. यासाठी अंगणवाडी सेविकांना शंभर टक्के उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे.

प्रशिक्षण कार्यक्रम आणि अंगणवाडी सेविका संख्या

  • 24 एप्रिल- नगर 648, संगमनेर 533, शेवगाव 313, अकोले 545, जामखेड 235, श्रीगोंदा 400 आणि कर्जत 355, पारनेर 393, राहुरी 355, राहाता 315, नेवासा 435.
  • 25 एप्रिल- पाथर्डी 289, कोपरगाव 248 आणि श्रीरामपूर 257 असा आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या