Type to search

टेक्नोदूत ब्लॉग मार्केट बझ

कॉन्टॅक्टलेस कार्डच्या अंतरंगात…

Share
कॉन्टॅक्टलेस कार्डच्या अंतरंगात..., Latest News Contacless Card Use

बिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर आता साधारण बाब बनली आहे. काळानुसार दोन्ही कार्डच्या तंत्रात अधिकाधिक सुरक्षितता आणि आधुनिकता आणली जात आहे. आपल्यापैकी अनेकांकडे कळत नकळतपणे कॉन्टँक्टलेस कार्ड असेल. कॉन्टँक्टलेस कार्ड म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ. गेल्या काही काळापासून मोठ्या संख्येने ग्राहकांकडे विविध बॅकांचे व्हिसा, मास्टरकार्ड आणि अमेरिकन एक्स्प्रेस
कंपनीचे नवीन कॉन्टँक्टलेन्स डेबिट आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. या कार्डच्या माध्यमातून मॉल आणि दुकानातील शॉपिंगसाठी कोणत्याही प्रकारची पिन किंवा ओटीपीची गरज भासत नाही. काही जण या कार्डला वायफाय कार्ड देखील म्हणतात.

कार्ड कसे काम करते
वायफाय किंवा कॉन्टँक्टलेन्स कार्डवर एक विशेष चिन्ह असते. त्या चिन्हाचा वापर पेमेंट मशिनवर केला जातो. हे चिन्ह अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते मोबाइलमधील टॉवरच्या चिन्हाप्रमाणे लहरी दर्शविणारे चिन्ह असते. हे चिन्ह पीओएस मशिनच्या चार सेटिंमीटर अंतरावर ठेवले जाते. दोन्ही बाजूंनी सिग्नल मिळताच पैसे खात्यातून काढून घेतले जाते. याप्रमाणे कार्डला स्वाइप किंवा डिप करण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर पिन देखील टाकण्याची आवश्यकता नाही. हे अन्य कार्डच्या तुलनेत वेगाने काम करते आणि लवकर पेमेंट करते.

कितपत सुरक्षित ? :
एकावेळी कमाल दोन हजार रुपयांपर्यंत कोणत्याही पिनविना व्यवहार करु शकतो. मग पेट्रोल पंप असो किंवा मॉल असो. तेथे दोन हजार रुपयांपर्यतच्या व्यवहारासाठी कार्ड पेमेंट करताना पिनची गरज भासत नाही.अर्थात बँकेच्या अ‍ॅपच्या माध्यमातून त्याची मर्यादा आपण निश्चित करु शकतो. म्हणजेच आपले कार्ड कोणाच्या हातात पडले तर तो एकावेळी किमान दोन हजाराची शॉपिंग किंवा खर्च करु शकतो. मात्र जोपर्यंत आपल्याला त्याचा पत्ता लागेल, तोपर्यंत त्याने दोन हजार रुपये उडविलेले असतील.

लक्षात ठेवा

  • अर्ज करताना बँकेकडून आपल्याला कोणते कार्ड मिळणार आहे, हे जाणून घ्या.
  • कार्ड नेहमीच आपल्यासमवेत ठेवा आणि कोणाच्याही हाती देऊ नका.
  • व्यवहार सुरक्षित राहण्यासाठी कार्डसमवेत एसएमएस सेवा देखील घ्या.
  • वायफाय कार्डने पेमेंट करण्यापूर्वी कॅशियरने किती रक्कम भरली आहे, हे तपासा.
  • वायफाय कार्डचे नेहमीच सावधानतेने वापर करावा. व्यवहार झाल्यानंतर एसएमस किंवा नेटबँकिंगवर त्याचीपडताळणी करा.
  • अशा प्रकारच्या व्यवहाराचे बिल घेण्यास विसरु नका.
  • कॉन्टँक्टकार्ड हरवल्यास तीन दिवसाच्या आत बँक आणि पोलिसांना माहिती कळवा आणि कार्ड ब्लॉक करा.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!