Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

काँग्रेसची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

Share
काँग्रेसची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द, Latest News Congress List Cm Entrusted

मुंबई – ठाकरे सरकारच्या खातेवाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. काँग्रेसच्या खातेनिहाय मंत्र्यांची यादी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा सोपविण्यात आली आहे. तर राज्यमंत्री असलेल्या विश्वजित कदम यांना कृषी खाते देण्यात आले आहे. याशिवाय, काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

खातेनिहाय यादी –
बाळासाहेब थोरात – महसूल
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
विजय वड्डेटीवार – ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन
के.सी.पाडवी – आदिवासी विकास
यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार- दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
अस्लम शेख – वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे
सतेज पाटील – गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम- कृषी आणि सहकार राज्यमंत्री

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!