Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकेश्वर : गुलाबी थंडीत पर्यटकांची गर्दी; ऑनलाइन खरेदीवर भर

Share
त्र्यंबकेश्वर : गुलाबी थंडीत पर्यटकांची गर्दी; ऑनलाइन खरेदीवर भर Latest-News-Cold-Season-Tourist-Crowd-Increase-in-Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर : कडाक्याच्या थंडीमुळे त्र्यंबकेश्वर नगरीत पर्यटकांनी गर्दी केली असून विकेंडच्या सुट्ट्या घालवण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे पर्यटकांचा कल वाढत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींच्या संख्येतही वाढ झाली आहे. थोड्यात दिवसांत नाताळ येत असल्याने पुढील आठवड्यात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

त्र्यंबकेश्वर भाविकांची गर्दी होत असते. यामुळे साहजिकच खरेदीचा उत्साहही अधिक दिऊन येतो. परंतु शहरात एटीएम ची संख्या कमी असल्याने पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन ते तीन एटीएम असून या ठिकाणी कॅश नसल्याने पर्यटकांना खरेदीला पर्याय शोधावा लागत आहे. यामुळे बहुतेक पर्यटक ऑनलाईन पेमेंटचा वापर करताना दिसत आहे.

त्यामुळे शहरात एटीएम असणे आवश्यक असून त्यामुळे पर्यटकांचा व्यवहार वाढून तो फायदा नगरपालिकेला होणार आहे. परिणामी थंडीत अधिक पर्यटक येत असल्याने तात्काळ बँक तसेच नगरपालिकेने याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!