Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

आज मध्यरात्रीपासून मुंबई, पुण्यातील सिनेमा हॉल, नाट्यगृहे बंद – मुख्यमंत्री ठाकरे

Share

मुंबई- आज मध्यरात्री 12 वाजेपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपुर, पिंपरी चिंचवड, मधील सिनेमा हॉल, नाट्यगृहे, जिम, जलतरण केंद्रे, शॉपिंग मॉल्स् हे कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यांनी आज विधानसभेत दिली आहे.

राज्यात कोरोनाचे 17 रुग्ण आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास विनाकारण करू नये, मॉलमध्येही जाणं टाळावं, असं आवाहनही त्यांनी केले आहे.

तसेच पिंपरी चिंचवड येथील शाळाही बंद राहणार आहे. व आज संध्याकाळी 5.30 वाजेनंतर परदेशातुन येणार्‍या विमानातील नागरीकांना वेगळं ठेवणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!