Thursday, April 25, 2024
Homeनगरलिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या आश्वासित प्रगती योजनेचा विषय मार्गी

लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या आश्वासित प्रगती योजनेचा विषय मार्गी

प्रशासनाचे आश्वासन : जि.प.लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य जिल्हापरिषद लिपीकवर्गीय संघटनेने लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांचे 10-20-30 चे लाभ मिळणेबाबत व परिचर संवर्गातील कर्मचार्‍यांना 10 वर्षांनंतर देण्यात येणार्‍या लाभासाठी 1 हजार 900 ग्रेड पे मिळण्याबाबत निवेदन दिले होते. 31 मे पर्यंत हा प्रश्न मार्गी न लागल्यास एक जूनपासून आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. त्यानुसार संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी 22 मे अखेरपर्यंत आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

- Advertisement -

संघटनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेेकर, विभागीय अध्यक्ष अशोक कदम, जिल्हाध्यक्ष कैलास डावरे, विकी दिवे, कल्याण मुटकुळे आदींनी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेेदन दिले होते. लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांचे 10-20-30 वर्षांनंतरचे सातवे वेतन आयोगानुसारचे सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे आदेश प्रशासनाने निर्गमित करावेत. तत्पूर्वी कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ सहाय्यक या संवर्गातील उर्वरित राहिलेले कर्मचारी तसेच कनिष्ठ सहाय्यक यांच्या प्रस्तावातील त्रुटी दूर होणे आवश्यक आहे.

यासाठी संबंधितांचे प्रस्ताव वेबसाईटवर प्रसिध्द करावेेत. प्रत्येकाला त्रुटी दूर करण्यासाठी ठराविक मुदत द्यावी. यानंतरच 31 मे अखेर आश्वासित प्रगत योजनेचे आदेश निर्गमित करण्यात यावेत. परिचर संवर्गातील ज्या कर्मचार्‍यांना दहा वर्षांचा लाभ दिला जाणार आहे, त्यांचे आदेशही शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात यावेत. प्रशासनाने आंदोेलनाची वेळ येऊ न देता सदर मागणीची पूर्तता करावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली होेती. त्यानुसार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यात सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या