Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : दुपारी अचानक अंधारले

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- दुपारी चारच्या सुमारास अचानक अंधारून आले अन काही क्षणातच मोठमोठे थेंब पडण्यास सुरूवात झाली. अचानक पाऊस सुरू झाल्याने उष्णता कमी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल का, या भितीने नागरिक धास्तावले आहेत.

कालपासून कडाक्याचे ऊन होते. आज सकाळपासूनच उष्णता जाणवत होती. दुपारी साडेतीननंतर आकाशात ढग साचले. दुपारी चारच्या सुमारास तर एकदम अंधारून आले. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच पावसाचे मोठमोठे थेंब सुरू झाले. काही भागात तुरळक स्वरूपात तर काही भागात मोठ्या प्रमाणात हा पाऊस झाला. कोरोनामुळे रस्त्यावर अपवादाने वाहनचालक होते. या पावसामुळे त्यांचीही आडोशाचा आधार घेण्यासाठी धांदल उडाली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!