Thursday, April 25, 2024
Homeनगरशहरावर आता ड्रोन कॅमेर्‍याची नजर

शहरावर आता ड्रोन कॅमेर्‍याची नजर

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सामाजिक अंतर न ठेवणार्‍या व्यक्ती, संस्था यांच्यावर आता ड्रोन कॅमेराची नजर राहणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या सबबी सांगून काही व्यक्ती संस्था नियमांची पायमल्ली करीत असून आता त्यांच्यावर लवकरच दंडात्मक कारवाई करणार केली जाईल, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली.

येथील शिवाजी चौकामध्ये ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण देशांमध्ये करोना बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वरिष्ठ स्तरावरून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिकरीचे प्रयत्न होत आहे. बराच काळ सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करूनही काही व्यक्ती, संस्था शहरासह बेलापूर परिसरात सामाजिक अंतराचे नियम पाळीत नाही.

- Advertisement -

पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, महसूल अधिकारी दिवसाची रात्र करून हा विषाणू पसरू नये म्हणून जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहे. याचे नागरिकांना भान नाही असाही खेद त्यांनी व्यक्त केला. जो कोणी कायदा पाळणार नाही, त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागेश सावंत, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे सचिन बडदे, फोटोग्राफर भानुदास बेरड, सतिश गायकवाड, निखिल देशमाने, संदीप ठोकळ, संतोष खाबिया, बजरंग दलाचे रुपेश हरकल, आरपीआयचे लहानु त्रिभुवन, प्रताप राठोड, बी. एम. पवार, दीपक कुर्‍हाडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी ड्रोन कॅमेर्‍यांची मदत देऊन शासनास सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या