Thursday, April 25, 2024
Homeनगरचीनमधून आलेला ‘त्या’ तरुणाचे रक्त नमुने प्रयोगशाळेत

चीनमधून आलेला ‘त्या’ तरुणाचे रक्त नमुने प्रयोगशाळेत

कोरोना : जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी) – मूळचा नेवासा तालुक्यातील रहिवासी आणि काही दिवसांपूर्वी कंपनीच्या कामानिमित्त चीनवारी करणार्‍या एका 25 वर्षीय तरुणाला शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे येथील आरोग्य विभागाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार संबंधित तरुणाला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

- Advertisement -

नेवासा येथे राहणारा व सुपा एमआयडीसी येथील एका नामांकित कंपनीत काम करणारा 25 वर्षीय तरुण हा कंपनीच्या कामानिमित्त काही दिवसांपूर्वी चीनमध्ये गेला होता. दरम्यान चीनमधून घरी परतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला श्रीरामपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातील वरिष्ठाच्या आदेशानूसार त्याला शनिवारी नरगरला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपाय सुरु आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले असून तपासणी रिपोर्ट आल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झालेली आहे की नाही हे तपासून योग्य तो निर्णय घेऊन उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या