Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मांजा विक्रीप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

Share
मांजा विक्रीप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल, Latest News China Manja Action Shrirampur

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील संगमनेर रोड परिसरात चायना मांजाची विक्री करणार्‍या दोन व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील संगमनेर रोड नॉर्दन ब्रँच परिसरात श्रीरामपूर शहर पोलिसांनी छापा टाकून सुनील एकनाथ उन्हाळे याच्याकडून 5000 हजार रुपये किंमतीचा तयार चायना मांजा तर विशाल अशोक उन्हाळे याच्याकडून 3000 हजार रुपये किंमतीचा चायना मांजा जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चायना मांजा विक्री व वापरावर बंदी असताना शहरात सर्रासपणे चायना मांजाची विक्री सुरू आहे. पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने याप्रकरणी पावले उचलली असून मागील आठवड्यामध्ये पालिकेने आठ ते नऊ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली होती. तर पोलिसांनी देखील काही व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले होते.

चायना मांजामुळे पशु पक्षांना इजा होऊन ते जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तसेच लहान मुले, माणसे देखील यामुळे जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरीही मांजाचा वापर थांबत नाही. त्यामुळे प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!