Friday, April 26, 2024
Homeनगरचायना मांजा विक्री करणार्‍यावर कारवाई करा

चायना मांजा विक्री करणार्‍यावर कारवाई करा

जाणीव फाउंडेशनचे डिवायएसपी व मनपा उपायुक्त प्रदिप पठारे यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) – चिनी मांज्यावर बंदी घातलेली असतानाही त्याचा शहरात सर्रासपणे वापर सुरू आहे. या मांज्यामुळे शहरात दुर्घटना घडल्याचे प्रकार घडले होते. तरीही या मांज्याची विक्री करणार्‍यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी जाणीव फाउंडेशनने डिवायएसपी व मनपा उपायुक्त प्रदिप पठारे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

- Advertisement -

यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, प्रदीप वाखुरे, इंजि.बाळासाहेब पवार, राहुल जोशी, शिवशर्मा चेमटे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, शंतनू पांडव, दिपक भंडारी, राहुल काळे, सुभाष बांगर, सचिन निक्रड, कमलापती कोते, इंजि. कैलाश दिघे यांच्यासह जाणीव फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्याने उपस्थित होते.

मकरसंक्रातीचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात मांजा व पंतग खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र या बाजारात बंदी असलेल्या चायना मांजाची सर्रास विक्री होत आहे. या मांजामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अनेक प्राण्यांना या मांजामुळे जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे हा मांजा विक्री करणार्‍यावर काठोर कारवाई करावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या