Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जनावरांनी खाल्ला सव्वातीन कोटींचा चारा; 10 चारा छावणी देयके: शासनाकडून निधी प्राप्त

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात दुष्काळ काळात सुरु करण्यात आलेल्या दहा चारा छावण्यावर तीन कोटी 24 लाख 14 हजार रुपये खर्च करण्यात आले. शासनाच्या दुष्काळ व टंचाई निवारण उपाय योजनाअंतर्गत जिल्ह्यत दहा चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यात 15 हजार मोठी व छोटी जनावरे दावणीला होती. शासनाकडून जिल्हाप्रशासनाला देयकाची रक्कम प्राप्त झाली असून त्याचे चारा छावण्यांना वाटप करण्यात आले आहे.

मार्च ते जून या कालावधीत दुष्काळाने जिल्हा होरपळून निघाला होता. जिल्हयात पाण्याची भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. पाण्याअभावी जनावरांसाठी चार्‍याची कमतरता निर्माण झाली होती. या दुहेरी संकटामुळे पशूधन जगवायचे कसे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला होता. या बिकट परिस्थितीत पशूधन जगविण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु करत शेतकर्‍यांना दिलासा दिला.

जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात तीन, नांदगाव तालुक्यात तीन, मालेगाव तालुक्यात तीन व येवला तालुक्यात एक अशा दहा चारा छावण्या सुरु होत्या. सिन्नर तालुक्यातील तीन छावण्यांमध्ये लहान मोठी एकुण 1 हजार 966 तर नांदगाव मध्ये 4 हजार 836, येवल्यात 976, मालेगावमध्ये 3 हजार 778 असे एकूण 11 हजार 556 जनावरे ही पहिल्या सात छावण्यांमध्ये होती. त्यानंतर सुरु करण्यात आलेल्या 3 छावण्यांमध्ये जनावरांची संख्या अधिक वाढली.

या जनावरांच्या चारा पाण्यासाठी ठेकेदाराला शासनाकडून दोन टप्यात 25 लाखांचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. उर्वरीत सव्वातीन कोटींच्या देयकांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

शासनाकडून प्राप्त निधीचे चारा छावण्याना वाटप करण्यात आले आहे. लहान जनावरांसाठी दिवसाला 45 रुपये तर, मोठया जनावरांसाठी 90 रुपये अनुदान देण्यात आले आहे.

मोठ्या जनावरे छावणी खर्च
तालुका   खर्च
सिन्नर     36,86,468
येवला      13,90,833
नांदगाव   68,93,395
मालेगाव  89,52,645
एकूण     2,09,23,341

लहान जनावरे छावणी खर्च
तालुका     खर्च
सिन्नर    15,79,914
येवला      5,96,071
नांदगाव   29,52,683
मालेगाव  38,36,848
एकूण     89,65,516

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!