Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जनगणनेसाठी आता तांत्रिक सहाय्यक व शिपाई

Share
जनगणना आता मोबाईलवर, Latest News Census Mobile Facility Sangmner

संगमनेर (वार्ताहर)- राज्यातील दशवार्षिक जनगणनेसाठी राज्यात उपलब्ध असणार्‍या तांत्रिक सहाय्यक व शिपाई यांची सेवा 18 महिन्यांसाठी उपलब्ध करून घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. दर दहा वर्षांनी भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे जनगणना करण्यात येते. या जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळ लागत असते.

कालावधीही अधिक असतो. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील तांत्रिक सहाय्यक व शिपाई यांच्या सेवा 1 फेब्रुुवारी 2020 पासून 31 जुलै 2021 अशा अठरा महिन्याच्या सेवा घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शासकीय सेवनिवृत्त कर्मचार्‍यांच्या सेवा ही घेता येऊ शकणार आहे. तांत्रिक सहाय्यक व शिपाई यांच्या सेवा घेतल्यानंतर कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावरती त्याची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. संबंधित कर्मचार्‍यांच्या सेवा वर केल्यानंतर 24 फेब्रुवारीपासून प्रशिक्षण घेण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!