Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेरात कत्तलखान्यांवर छापे, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा

संगमनेरात कत्तलखान्यांवर छापे, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा

संगमनेर (प्रतिनिधी) – राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना व सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना देखील संगमनेरात सर्रास जनावरांची कत्तल सुरू आहे. शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता मोगलपुरा येथे अशा कत्तलखान्यावर छापा टाकला. या छाप्यात 1 लाख 98 हजार रुपयांचे सुमारे 1 हजार किलो मांस जप्त करुण्यात आले आहे. तर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंश जनावरांची कत्तल करुन त्याची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी मोगलपुरा येथील वेगवेगळ्या तिन ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात एका ठिकाणी 350 किलो मांस, 70 हजार रुपयांचे, दुसर्‍या ठिकाणी 350 किलो मांस 68 हजार रुपयांचे, तिसर्‍या ठिकाणी 300 किलो मांस, 60 हजार रुपयांचे असे सुमारे 1 लाख 98 हजार रुपयांचे मांस पोलिसांनी छाप्यादरम्यान जप्त केले आहे.

- Advertisement -

याबाबत अबुल बरकल बशीर कुरेशी (रा. मोगलपुरा, संगमनेर), मोमिन अब्दुल रहेमान (रा. मोगलपुरा), एजाज जलीम कुरेशी (रा. मोगलपुरा, देवीगल्ली, संगमनेर) या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 269, 429, 188, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5 क, 9 अ प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आरवडे, पोलीस नाईक व्ही. जी. खाडे, पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या