Type to search

Featured मुख्य बातम्या

कोरोना : नागरिकांनी घाबरुन न जाता स्वतःची काळजी घ्यावी – आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे

Share

मुंबई – राज्यातील एका कोरोनाबाधित वृद्धाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र राज्यातील इतर रुग्णांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री बोलतांना म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. मुख्यमंत्र्यानी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांची बैठक घेतली असून यात काय करावे आणि काय करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे. तसेच नागरिकांनी घाबरुन न जाता स्वतःची काळजी घ्यावी, तसेच सोबतच हा रोग पसरू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या सर्व राजकीय कार्यक्रमासह मोठे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. गरज पडल्यास शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!