Type to search

Featured नाशिक

12 डिसेंबर रोजी खेडगाव गटाची पोटनिवडणुक

Share

खेडेगाव । वार्ताहर

खेडगाव जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणुक दि.12 डिसेंबर रोजी जाहीर झाली असून यानिमित्ताने सर्वच गट तट कामाला लागलेले दिसत आहे.यंदाची निवडणुक ही श्रीराम शेटे-दत्तात्रय पाटील गटाविरुदध सुरेश डोखळे -सुनिल पाटील गट अशीच होण्याची शक्यता आहे.
दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात आ.नरहरी झिरवाळ यांनी प्रचंड मतांनी बाजी मारली.

त्यात खेडगाव गटातही राष्ट्रवादी कॉग्रेसने  आघाडी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी  कॉग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत.आमदार झिरवळ याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे मते वाढली असल्याचे चित्र आहे.तथापी शिवसेना आपला बालेकिल्ला शाबुत ठेवण्याचा प्रयत्न करीत अांहे.सध्या राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांचे नाव चर्चेत आहे तर शिवसेनेच्यावतीने सभापती एकनाथ खराटे यांचे नाव अग्रक्रमावर आहे.

तथापि शेटे-पाटील यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचा छुपा अंतर्गत गट  दुसर्‍या उमेद्वाराला शिवसेनेकडून उमेद्वारी  देण्यासाठी प्रयत्नशील असून रा.कॉ.च्या राजकीय दरबारात शेटे-पाटील  गटाला  शह देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु झाला आहे.  शिवसेनेच्यावतीने मागील काळात माजी आमदार धनराज महाले हे निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांंनी राजीनामा दिला होता.त्यामुळे हीं पोटनिवडणूक होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!