Friday, April 26, 2024
Homeनगरबीएसएनलचे ग्राहकाबरोबर कर्मचारी ही घटले !

बीएसएनलचे ग्राहकाबरोबर कर्मचारी ही घटले !

राहाता केंद्रातील 11 गावात अवघे 550 ग्राहक अन् तीन कर्मचारी

अस्तगाव (वार्ताहर) – बीएसएनएलच्या स्वेच्छा निवृत्त योजनेत तब्बल 79 हजार कर्मचार्‍यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यामुळे ग्राहक कमी झाल्यामुळे कर्मचारीही कमी झाले आहेत. राहाता विभागात 11 गावात फक्त 450 ग्राहक आहेत. तर या 11 गावांसाठी अवघे तीनच कर्मचारी आहेत. यामुळे ग्राहक आणि कर्मचारी यांची मोठी कसरत पाहावयास मिळत आहे.

- Advertisement -

मोबाईलच्या जमान्यात लँडलाईन दुरध्वनींची संख्या कमालीची घटली आहे. निव्वळ राहाता दुरध्वनी केंद्राअतर्गत सुमारे 12 हजार ग्राहक होते. 2004 ते 2005 नंतर मोबाईलमध्ये क्रांती झाली, नवनविन कंपन्या उतरल्याने विविध आकर्षक योजना आल्याने त्या मोबाईल वापरणे ग्राहकांच्या खिशाला परवडू लागल्याने अनेकजण लॅन्डलाईन फोन बंद करुन मोबाईल वापरु लागला. बीएसएनएलच्या लॅन्डलाईनवर ब्रॉडबॅॅन्ड ही सुविधा इंटरनेटसाठी मिळत असायची परंतु मोबाईलमधुन या इंटरनेटला मोठा पर्याय मिळाल्याने अपसुकच लॅन्डलाईन फोनकडे ग्राहक कानाडोळा करु लागले.

त्याची परिणीती म्हणुन 2005 नंतर दुरध्वनी वापरणारांची संख्या घटत गेली. ती इतकी घटली की राहाता दुरध्वनी केंद्रातर्गत 12 हजारावरुन ते अवघे 550 ग्राहक उरले आहेत. हे 550 ग्राहक 11 गावे मिळुन आहेत. देशभर ही स्थिती राहिल्याने बीएसएनएल कंपनीने 50 वर्ष वयाच्या जवळपास 79 हजार ग्राहकांना स्वेच्छा निवृत्ती दिली आहे. परिणामी ग्राहक ही घटले आणि कर्मचारी यांची संख्याही घटली आहे.

आता जे ग्राहक उरले आहेत, त्यांची संख्या कमी झाली आहे. एकेकाळी निव्वळ राहाता शहरात 2500 ग्राहक होते तेथे आज अवघे 350 ग्राहक बीएसएनएलचा लॅन्डलाईन वापरत आहेत. शासकिय संस्था, व्यापारी, रुग्णालये, इंटरनेट वापरणारे ग्राहकच आता उरले आहेत. अस्तगाव दुरध्वनी केंद्रात 500 वरुन 25 ग्राहक उरले आहेत. गणेशनगर ला 25, पुणतांबे येथे 80, वारीला 30, पोहेगाव 25, विमानतळामुळे काकडी येथे 35, जवळके येथे 3, रांजणगांव देशमुख अवघे 2 उरले आहेत. या सर्व ठिकाणी दुरध्वनी केंद्र आहेत. तर रामपूरवाडी व चांदेकसारे येथे दुरध्वनी केंद्र असुनही तेथे शुन्य ग्राहक आहेत.

राहाता केंद्रात (विभागात) आता या सर्व गावांचे एकूण 550 ग्राहक आहेत. त्यासाठी अवघे तीन कर्मचारी आहेत. त्यात एक महिला तर दोन पुरुष कर्मचारी आहेत. या सर्वांवर या 11 गावांचा लोड आहे. या तीन कर्मचार्‍यांच्या माध्यमातून सेवा देणे मोठे अडचणीचे ठरत आहे. तक्रार केल्यानंतर दोन दिवसांनी कर्मचारी उपलब्ध होतात. यात कर्मचार्‍यांची यात मोठी हाल होत आहे.

कंत्राटी कर्मचार्‍यांना वर्षापासून पगार नाही
बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या जोडीला कंत्राटी कर्मचारी आहेत. परंतु ठेकेदाराने या कर्मचार्‍यांना तब्बल वर्षभरापासुन पगारच केलेला नाही. राहाता केंद्रात सहा कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना मे 2019 पासुन पगारच केलेला नाही. म्हणजेच वर्षभरापासुन त्यांना पगार नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यात मोठी नाराजी आहे. या कर्मचार्‍यांना अवघा 200 रुपये दिवसाला पगार आहे. महागईच्या जमान्यात हा पगार परवडणारा नाही अन त्यातच तो वर्षभरापासून मिळत नाही. हे वस्तुस्थिती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या