Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लाचखोर राज्य करनिरीक्षक भोर अटकेत

Share
खंडकरी शेतकर्‍यांना जमीन मिळवून देण्याच्या प्रकरणात मदत करून ते मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ कायदा शाखेच्या लिपीकाने शेतकर्‍याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली.

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वस्तू व सेवाकर कार्यालयातील राज्य करनिरीक्षक अधिकारी (वर्ग- 2) व त्याचा खाजगी सल्लागार सहकार्‍यास 15 हजारांची लाचेची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुपत पथकाने रंगेहाथ पकडले. राज्य करनिरीक्षक विशाल सुखदेव भोर (वय- 34 रा. भूषणनगर, केडगाव) आणि खाजगी कर सल्लागार निलेश म्हातारबा बांगर (वय- 28 रा. रानमळा बेल्हे, ता. जुन्नर, पुणे), अशी लाचखोरांची नावे आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाने मंगळवारी (दि. 21) केली. पारनेर तालुक्यातील निघोज (शिरसुले) येथील एकाने काही दिवसांपूर्वी कृषी सेवा केंद्र चालू केले होते. त्यावेळी त्यांनी सरकारला कर भरण्यासाठी जीएसटी नंबर काढला होता. परंतु त्यांनी पुढे ते दुकान बंद केले. दोन वर्षांपासून त्यांचे दुकान बंद होते. मात्र जीएसटी नंबर बंद केला नाही. त्यामुळे त्यांना जीएसटी कार्यालयातून फोन आला की, तुम्हाला दंड पडला आहे, तो भरावा लागेल. नंबर बंद करायचा असेल तर मागील दंड भरावाच लागेल तरी, तुम्ही कार्यालयात या मग काहीतरी मार्ग काढू असेही सुचवले.

तक्रारदार यांना आकारण्यात आलेला एक लाख 13 हजार रूपयाचा दंड न भरता जीएसटी खाते बंद करण्यासाठी निरीक्षक विशाल भोर याने सोमवारी (दि. 20) तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 15 हजार रूपये लाचेची मागणी करून खाजगी कर सल्लागार निलेश बांगर यांच्याकडे देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाकडे तक्रार केली.

त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने बेल्हे (ता. जुन्नर) येथील बांगर असोशिएटस कार्यालयात मंगळवारी (दि. 21) सापळा लावला. यावेळी पंचासमक्ष निलेश बांगर याला 15 हजाराची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. तर निरीक्षक विशाल भोर याला नगरच्या वस्तू व सेवाकर कार्यालयातून ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलिस उपाधीक्षक हरीष खेडकर, पोलिस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पोलिस हवालदार तनवीर शेख, रमेश चौधरी, प्रशांत जाधव, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, अशोक रक्ताटे, हरूण शेख यांच्या पथकाने केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!