Wednesday, April 24, 2024
Homeनगरएक हजाराची लाच घेताना एकास पकडले

एक हजाराची लाच घेताना एकास पकडले

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – कुकडी पाटबंधारे विभाग 2 मधील आरेखक म्हणून कार्यरत असणारे वसंत सकट यांना 1000 रुपयांची लाच घेताना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

दौंड येथील तक्रारदारांनी त्यांच्या आजोबांच्या नावे कर्जत तालुक्यातील खेड गावात असलेली जमीन कुकडी पाटबंधारे विभागाच्या लाभ क्षेत्राखाली येत नसल्याबाबतचा दाखला देण्यासाठी अर्ज केला होता. यात वसंत सकट यांनी दाखला देण्यासाठी पैशाची मागणी केली असल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

यात लावलेल्या सापळ्यात लोकसेवकास दिनांक 18 मार्च रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष रुपये 1000 रुपयांच्या लाचेची मागणी करुन सदरची रक्कम दिनांक 18 मार्च रोजी पंचासमक्ष कुकडी पाटबंधारे कार्यालय, श्रीगोंदा आवारात स्वीकारली असता रंगेहाथ पकडले आहे.

सदर कारवाई श्याम पवरे (पोलीस निरीक्षक ला. प्र. वि अहमदनगर), हरीष खेडकर (पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. अहमदनगर), मदतनीस अधिकारी दीपक करांडे (पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. अहमदनगर), मार्गदर्शक सुनील कडासने (पोलीस अधीक्षक ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), नीलेश सोनवणे (अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या