Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांना प्रधानमंत्री पुरस्कार

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक येथील योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांना योगाचा प्रचार व प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे.

आयुष मंत्रालयाच्या वतीने येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात योगाच्या प्रचार प्रसारातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रधानमंत्री पुरस्कारांचे’ वितरण करण्यात आले होते. आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक आणि मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यावेळी मंचावर उपस्थित होते.

योग प्रचार व प्रसार कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील व्यक्ती व संस्थांना यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातून नाशिक येथील योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांना व्यक्तिगत श्रेणीत सन्मानित करण्यात आले.

योगाचार्य डॉ. मंडलिक यांनी गुरुकुल पद्धतीने केला योगाचा प्रसार

हटयोग, उपनिषद आणि भगवतगीतेचा अभ्यास व संशोधन करून योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक हे गेल्या ५५ वर्षांपासून योगाभ्यासाचे धडे देत आहेत. डॉ. मंडलिक यांनी नाशिक येथे १९७८ मध्ये ‘भारतीय योग विद्या धाम ’ संस्थेची स्थापना केली.

या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गुरुकुल पद्धतीने योगाचा देश-विदेशात प्रचार व प्रसार केला. देशभरात या संस्थेचे एकूण १६० केंद्र तर परदेशात १६ केंद्र आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ५ लाख लोकांनी योगाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी योगाच्या प्रचार व प्रसारासाठी विविध पुस्तकही लिहिली आहेत. योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना गौरविण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!