Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

‘आचार संहिता’ म्हणजे नेमकं काय रे भाऊ ?

Share

मुंबई | वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. ही घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता पाळणे राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे. आचार संहिता काय असते, ती तोडली तर काय होते, यासाठी कोणता कायद्याची तरतूद करण्यात आली आहे, याचे काय परिणाम होतात असे अनेक जनसामान्यांच्या मनात असतात, तर आचारसंहिते विषयी जाणून घेवूयात.

‘आचारसंहिता’ म्हणजे नेमके काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता 1950 या वर्षी अंमलात आल्यानंतर आदर्श निवडणूक आचारसंहितेचाही स्वीकार करण्यात आला. यामध्ये निवडणूका जाहिर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये, असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे Do’s And Dont’s म्हणजेच निवडणूक ‘आचारसंहिता’ होय.

निवडणूक कधी घ्यायची याची तारीख ठरवण्याचे पूर्ण हक्क निवडणूक आयोगाकडे असतात. साधारणतः मतदानाच्या तारखेच्या 21 दिवस आगोदर आचारसंहिता लागू होते. तसेच निवडणूकीची घोषणा होताच आचारसंहिता लागूही करण्यात येते.

एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाला उमेदवार याचे पालन करतात की नाही याकडे लक्ष देण्याचा संपूर्ण अधिकार असतो. तसेच उमेदवार चुकीचे वर्तन करत असल्यास अथवा नियम मोडत असल्यास संबंधित उमेदवाराला निवडणूकीतून बेदखल करण्याचाही हक्क आयोगाकडे आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष या प्रचार काळात आपल्या सूचनांचे पालन करत असतो आणि ते त्याला बंधनकारकही असते.

पक्षाने आपल्या प्रचारात असे कोणतेही भाषण, प्रचार सामग्री, घोषणा अथवा आश्वासने देऊ नयेत ज्यामुळे समाजातील जाती, धर्म, वंश, बोलीभाषा इत्यादींमध्ये फुट पडेल, त्यांच्यात वाद निर्माण होतील. या काळात कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिपक्षावर, त्यांच्या कामगिरीवर, कामांवर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या धर्माबद्दल, जातीबद्दल बोलता येणार नाही. तसेच त्यांची व्यक्तीगत बदनामी ही करता येणार नाही, असे केल्यास त्यास आचारसंहितेचा भंग समजण्यात येतो.

या काळात जरी प्रचार करता येत असेल तरीही आचारसंहितेमध्ये नागरिकांबद्दलही विचार करण्यात आला आहे. त्यामुळं कोणताही प्रचार रात्री 10 च्या आतच संपवणे, थांबवणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांच्या खासगी इमारतीचा, मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही. तसेच कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचार सभांमध्ये, मिरवणूकांमध्ये, भाषणांमध्ये कसल्याच प्रकारचा अडथळा आणण्याचा अधिकार नाही, असं केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.

निवडणूकीच्या प्रचारात भ्रष्टाचाराला काडीमात्र स्थान नसते. मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं, महागड्या वस्तू देणं, मतदारांना अमिष दाखवणं, लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटलं आहे. या गोष्टी प्रत्येक उमेदवारानं आणि पक्षानं लक्षात ठेवायला हव्यात.

कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला परवानगीशिवाय प्रचार, भाषण करता येणार नाही. याकरिता उमेदवारानं आपल्या सभांसाठी प्रशासनाचं स्वीकृतीपत्र मिळवणं आवश्यक आहे. तसंच कार्यक्रमाच्या, मिरवणूकीच्या अथवा सभेच्या काही दिवस आधी प्रचारकार्य, कार्यक्रमाची वेळ, स्थळ यांची माहिती संबंधीत पोलीस ठाण्यात देणं आवश्यक आहे. जर ह्या गोष्टी केल्या नसतील तर संबंधीत सभा रद्द करण्याचा अथवा बंद करण्याचे अधिकार पोलिसांना तसंच निवडणूक आयोगाला आहेत.

आचार संहिता लागू झाल्यानंतर होत नाहीत ही कामे

मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिथी म्हणून सहभागी होऊ शकत नाहीत.

आचार संहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही.

कुठल्याही योजना किंवा इमारतीचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही.

या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही. अत्यावश्यक असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.

सरकारी खर्चातून असे एकही काम केले जाऊ शकत नाही, ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल.

उमेदवार, राजकीय पक्षांना सभा, संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणे आवश्य आहे.

धार्मिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या प्रचाराचे मंच म्हणून करता येत नाही.

कुठल्याही व्यक्तीकडे 50 हजारांपेक्षा अधिक रोकड किंवा 10 हजार रुपयांपेक्षा अधिकचे गिफ्ट सामुग्री सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!