Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

सकाळच्या सत्रात मतदारांचा थंड प्रतिसाद, दुपार नंतर टक्का वाढणार

Share

मुंबई | वृत्तसंस्था

राज्यभरात विधानसभेच्या मतदानाला सकाळी 7 पासूनचे सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा परिणाम थेट आज मतदानावर दिसून येत आहे. राज्यात सकाळच्या सत्रात मतदारांनी अल्प प्रतिसाद नोंदवला आहे. सकाळच्या सत्रात अकरा वाजेपर्यंत केवळ सतरा टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

अनेक मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांन सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीसह मतदान केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत, नितीन गडकरी, अजित पवार, कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या दिग्गज नेत्यांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र सामान्य नागरिकांकडून मतदानाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंडळींनी देखील मतदान करून आपला हक्क बजावला आहे. बंग दाम्पत्य, विकास आमटे यांनी देखील मतदान करून मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. सेलिब्रिटींमध्येही मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. प्रशांत दामले यांनी वर्सोवा येथे मतदान करून निवडणूक आयोगाचे त्यांनी कौतुक केले आहे. तसेच पद्मिनी कोल्हापुरे, किशोरी शहाणे-वीज यांनी  मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी पत्नी अभिनेत्री गितांजली कुलकर्णीसह गोरेगाव येथे मतदान करण्याकरता पोहोचले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!