Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

नागपूर महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची बदली

Share

नागपूर :

प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात तुकाराम मुंडे यांचा समावेश आहे. तुकाराम मुंडे हे या आधी एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच असून त्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव सरकारने ही खेळी खेळल्याचे बोलण्यात येत आहे. मुंढेनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे.

नाशिक, नवी मुंबई महापालिकेत सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्याविरोधात एकत्र आल्याचे याआधी दिसलेले आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच राजकारण्यांना जरी ते नकोसे वाटत असले तरी, सर्वसामान्यांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!