Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शन उद्या पासून बंद!

त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शन उद्या पासून बंद!

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णया नुसार दि. १८ मार्च पासून त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणारचे महिती पत्रक मंदिराच्या सर्व प्रवेश द्वारांवर लावण्यात आली आहे. उद्या पासून त्र्यंबकेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद राहील.

- Advertisement -

दरम्यान, यात्रेकरू भाविकांनी याची नोंद घ्यावी असे सांगण्यात आले आहे. सर्व विश्वस्त या बैठकीला उपस्थित होते. आज साधारण साडे तीन वाजे दरम्यान बैठक संपली. करोना या संसर्गजन्य आजरावर मात करण्यासाठी सामाजिक जाणीव ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेश होई पर्यंत मंदिर बंद राहणार असले तरी अंतर्गत देवस्थानची पूजा सुरू राहील असे संकेत आहे.

अनादी कालावधी पासून त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. इतिहासात प्रथमच त्र्यंबकेश्वर मंदिर बंद रहाणार आहे. या पूर्वी असा प्रसंग कधीच आला नव्हता. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोधार करण्यात येऊन 235 वर्ष झाले आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थानने अलीकडेच कामचुकारपणाचा ठपका ठेवत दोन अधिकाऱ्यांना तूर्त सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तूर्तास अंकुश जाजडा हे देवस्थान कार्यलयत महत्वाची कामे पाहत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या