Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

प्रवरासंगम येथे डम्परवर खासगी प्रवासी बस धडकली; युवक ठार

Share
ट्रॅव्हल्सच्या धडकेत डंपरची टाकी फुटून आग; एकजण ठार, Latest News Breaking News Travels Bus Dumper Accident Death Injured Devgad Phata

डम्पर चालकासह बसमधील 10 जण जखमी; दोघे गंभीर

देवगडफाटा (वार्ताहर)-  नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे रविवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर कमानीसमोर डम्परला खासगी प्रवासी बसने समोरून धडक दिल्याने डम्परची डिझेल टाकी फुटून डम्परने पेट घेतला त्यात एक जण होरपळून ठार झाला तर डम्परचालकासह बसमधील 10 जण जखमी झाले. पैकी दोघे गंभीर जखमी असून बसमधील जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मृत युवक डम्परचालकाचा मदतनीस होता. डम्पर प्रवरासंगमचा असून त्यावरील चालक व मदतनीस दोघेही प्रवरासंगमचे आहेत.

याबाबत मृताचा भाऊ शहादेव रामकिसन गायकवाड (वय 27) धंदा-मजुरी रा. प्रवरासंगम ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझा लहान भाऊ पांडुरंग रामकिसन गायकवाड (वय 22) हा मोलमजुरी काम करत असते. दोन महिन्यांपासून तो गावातील कल्याण उन्हाळे यांचे डंपरवर मजुरी काम करत होता. 18 जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कामासाठी फोन आल्याने तो घरुन गेला हेता.

दि. 19 रोजी पहाटे पाचच्या सुमारास मला नेवासा पोलीसांनी फोन करुन बोलावून घेतले व सांगितले की पहाटे पावणेदोनच्या सुमारास नगर-औरंगाबाद रोडवरील सिद्धेश्वर मंदिरासमोरील कमानीजवळ नगरकडून येणार्‍या ट्रॅव्हल बस (खासगी प्रवासी बस) चालकाने भरधाव वेगात येवून धडक दिल्याने सदर अपघातात भाऊ पांडुरंग गायकवाड यास अपघातात त्याच्या डंपरला मार लागून डम्परची डिझेल टाकी फुटून डम्परने पेट घेतल्याने त्यात तो जळून मरण पावला. डम्पर चालक अशोक शिंदे हा जखमी झाला.

तेव्हा मी माझे चुलते चंद्रकांत सदाशिव गायकवाड, रोहिदास निकम व आमच्या गावातील लोक आम्ही तेथे गेलो तेव्हा आम्हास तेथील लोकांकडून ट्रॅव्हलवरील चालक याचे नाव मोहन थावरा राठोड असे असल्याचे समजले आहे. तेव्हा आम्ही पाहिले असता माझा भाऊ व त्याच्याकडील विनानंबर डम्परला नगरकडून येणारी ट्रॅव्हल बस (जीजे 14 झेड 8585) वरील अज्ञात चालकाने त्याच्याकडील बसने जोराची धडक दिल्याने डंपर पेटल्याने माझा भाऊ पांडुरंग रामकिसन गायकवाड हा जजळून मरण पावला. तेव्हा आम्ही त्यास तेथील डम्परमधून खाली काढले. सदर अपघात ट्रॅव्हल वरील अज्ञात चालकाने वाहन भरधाव हयगयीने चालवून त्याचे नियंत्रण सुटल्याने डम्परला जोराची धडक दिली.

ट्रॅव्हलवरील चालक हाच त्याचे मरणास व कमीअधिक जखमास कारणीभूत झाला आहे. सदर अपघातानंतर ट्रॅव्हलवरील चालक त्यास कोणतीही मदत न करता पळून गेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी ट्रॅव्हल चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर फर्स्ट 39/2020 भारतीय दंड विधान कलम 304 अ, 279 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. तमनर करत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!