Type to search

Featured नाशिक

मतदार यादी प्रक्रिया पूर्ण

Share

दे. कॅम्प । वार्ताहर

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाची आगामी निवडणूक जानेवारी 2020 मध्ये होण्याचे संकेत असून प्रशासनाने त्या द़ृष्टीने सुरू केलेली तयारी मतदार यादीच्या प्रक्रियेने पूर्ण झाली आहे.

कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा 2007 नुसार प्रतिवर्षी जूनमध्ये मतदार नोंदणी करून जुलैमध्ये ते प्रसिद्ध केले जातात. आगामी निवडणूक लक्षात घेऊन नवीन मतदारांनी नावे नोंदविण्यासाठी 289 अर्ज दाखल झाले होते. त्याची छाननी करण्यात आली. तसेच प्रशासनाने तयार केलेल्या मतदार यादीवर घेण्यात आलेल्या हरकतीनुसार 1159 मतदारांवर 1288 हरकती आल्या होत्या.

त्यातील 414 हरकती नामंजूर करण्यात आल्या. नियमानुसार हरकत नोंदविणार्‍याने हरकतीच्या वेळी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परंतु वॉर्ड 2, 4, 6 व 7 येथील काही हरकतदारांनी ऐनवेळी माघार घेत अनुपस्थित राहिले.

त्यामुळे कायद्यानुसार सदरच्या हरकती परिपूर्ण मानल्या गेल्या नाहीत. तब्बल 13 दिवस कर्नल डी. के. खत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या सहाय्यकांमार्फत ही प्रक्रिया सुरू होती. 15 सप्टेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वीदेखील नाव नोंदणीसाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!