Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश

पाकिस्तानच्या व्यापार बंदीमुळे या गोष्टींचा भासू शकतो भारतात तुटवडा..

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरसंबंधीचं कलम 370 भारताने संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. नुकतेच भारताबरोबरचे व्यापार आणि राजनैतिक संबंध पाकिस्तानने संपवले असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानातून भारतात आयत होणारया वस्तूंची संख्या मोठी आहे. पाकिस्तानच्या वस्तू भारतात लोकप्रिय असणाऱ्या मध्ये चामडे, फळ आणि सिमेंटचा समावेश आहे.

अशातच आधी पासून मंदीचा मार सोसत असलेल्या पाकिस्तानने  भारताबरोबर आर्थिक व्यापार थांबल्यास आर्थिक स्थिती अधिक बिकट होईल यात तीळमात्र शंका नाही.

भारतात पाकिस्तानातून येणाऱ्या काही मुख्य वस्तू..

गेल्या दोनवर्षात भारतात पाकिस्तानी फळांची मोठी मागणी होती. त्यामध्ये सुकामेवाचा देखील समावेश होता. पाकिस्तानातून आलेल्या फळांची मागणी काश्मिरी बाजारपेठेसह दिल्लीत मोठी मागणी आहे. यात टरबूजचा वाटा मोठा आहे.

त्याच प्रमाने चुना, दगड आणि सिमेंट या गोष्टी पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात आयात होतात. पाकिस्तानी सैंधव मीठही भारतीय बाजारपेठेत येते. अनेक सौंदर्य प्रसाधनं आणि उत्पादनांमध्ये वापरली जाणारी मुलतानी माती पाकिस्तानातून येते.

पाकिस्तानातून मुख्य आयात होणारी गोष्ट आहे चामडं. चर्मउद्योगाला पाकिस्तानी चामड्याचा उपयोग होतो. तसेच पेट्रोलियम आणि तेल पाकिस्तानातून आयात केले जाते

पाकिस्तानातून भारतात काही मेडिकल उपकरणांची देखील आयात होते. मेटल कंपांउंड, कार्बोनिक केमिकल्स या वस्तू तेथून येतात. शिवाय पाकिस्ताना कापूस आणि ताग्याचा मोठा निर्यातदार आहे. भारतालाही पाकिस्तानातून कापड आणि कापूस मिळतो. याशिवाय स्टील आणि पोलाद पाकिस्तानातून भारतात येतं. तांब्याचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर होतो. हे तांबं येतं पाकिस्तानातून.

भारतात काही पाकिस्तानी ब्रँड्सची आउटलेट्स आहेत. त्यापैकी जास्त करून ब्रँड्स काश्मीरमध्ये विकले जातात. शिवाय उत्तर भारताच्या काही भागात याची उत्पादनं दिसतात. पाकिस्तानी एंब्रॉयडरी आणि जरीकाम भारतात विकलं जातं. बेरीजी या फॅब्रिक ब्रँडचं दिल्लीत स्टोअर आहे. शिवाय जुनैद जमशेद नावाचा ब्रँडही उत्तर भारतात दिसतो. याशिवाय लाहौरी कुर्ते, पेशावरी चप्पल हेसुद्धा दिल्लीत लोकप्रिय आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!