Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

तो आवाज HAL सुपर विमान चाचणीचाच

Share

नाशिक l वार्ताहर

आकाशात बाॅम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज झाल्याने नाशिक काही क्षणापुरते हादरले तर अचानक आकाशात ढगफुटी सारखा मोठा आवाज सायंकाळी 4 ते पाच वाजता आल्याने नागरिकांना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. एकंदरीतच हा येवढा मोठा आवाज कसला आला आणि नेमकं काय असं घडलं या द्विधा मनस्थितीत नागरिक आकाशाकडे पाहुन तर्क वितर्क लावतांना दिसले.

असे असले तरी पंरतु आता तो आवाज नेमका कसला आणि कोणाचा होता हे माञ स्पष्ट झाले असुन नागरिकांच्या चर्चेला पुर्ण विरामच लागला आहे. HAL येथे सुपर सोनिक विमान चाचणीचा तो आवाज होता ,अवकाशात असल्याने तो सर्वदूर ऐकू आला.

नियमित चाचणी असते ती. मोटारसायकल जसे अधिक एक्सलेटर दिले की मिस फायरच आवाज होतो अगदी तसाच तो विमानाचा आवाज होता अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!