Type to search

Featured क्रीडा मुख्य बातम्या

टी 20: भारत-आफ्रिका निर्णायक सामना उद्या बुधवारी

Share

मोहाली | सलील परांजपे

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमधील 3 सामन्यांच्या  टी20 मालिकेला रविवारी 15 सप्टेंबर 2019 रोजी सुरुवात झाली खरी, पहिला टी20 सामना धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश मैदानावर होणार होता. मात्र मागील दोन दिवस बरसत असलेल्या पावसाने सामन्याच्या दिवशीही धुवाधार बँँटिंग केली आणि मैदानाच्या चारही बाजूंना प्रचंड पाणी साचल्यामुळे सामना रद्द करण्यात आला.

आता मालिकेतील दुसरा निर्णयक सामना बुधवारी 18 सप्टेंबर रोजी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या बिंद्रा मैदानावर सायंकाळी 7 वाजता  खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर करण्यात येणार आहे. पहिला सामना रद्द झाल्यामुळे  दोन्ही संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज आहेत.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत त्यांच्यावर आहे. तर अष्टपैलूंमध्ये हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, रविंद्र जडेजा आहेत. गोलंदाजीची मदार युवा दीपक  चाहर, नवदीप सैनी, राहुल चाहर आणि खलील अहमद यांच्यावर आहे. भारतीय संघाला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी आपला सर्वोत्तम संघ निवडण्याची संधी मिळणार आहे. यात अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे रोहित शर्मासोबत सलामीला कोण राहुल का धवन? तसेच नंबर 4वर  कोण?

दक्षिण आफ्रिका संघाच्या फलंदाजीची मदार, क्विंटन डिकॉक, टेण्ड बाऊमा, बेरून हेन्ड्रिक्स, रुसी वेन्दर डू सेन, डेविड मिलर यांच्यावर  आहे. अष्टपैलूंमध्ये आंद्रे पीटलूकवयो, अँड्रीच नॉर्टीजे, दिवेन प्रिटोरियस आहेत. गोलंदाजीत कांगिसो रबाडा, तेवस शम्सी, जुनिअर दला जॉर्ज लिंड हे पर्याय आहेत.

या मैदानावर एकूण 30 हजार प्रेक्षक बसू शकतात. एंड्स पॅव्हेलिन एन्ड, सिटी एन्ड हे मैदान किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रणजी संघ  पंजाबचे घरचे मैदान आहे. सर्वाधिक धावसंख्या भारत 211-4 विरुद्ध श्रीलंका 12 डिसेंबर 2009 नीचांकी धावसंख्या पाकिस्तान 158-5 विरुद्ध न्यूझीलंड 22 मार्च 2016 सर्वात मोठा विजय भारत 6 विकेट्स विरुद्ध श्रीलंका 12 डिसेंबर 2009 निसटता विजय ऑस्ट्रेलिया 21 धावांनी विरुद्ध पाकिस्तान सर्वाधिक स्कोर विराट कोहली 82 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2016 उपांत्य सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया  9 चौकार 2 षटकार चेंडू 51.

सर्वाधिक बळी ऍडम मिल्ने 1 सामना 4 षटके 0 निर्धाव 26 धावा 2 विकेट्स बेस्ट फिगर्स जेम्स फौकनेर 4 षटके 27 धावा 5 विकेट्स आमनेसामने 13 भारत विजयी 8 आफ्रिका विजयी 5 सर्वाधिक झेल मार्टिन गप्टिल 3 2016

यांच्यावर असेल लक्ष: रोहित, विराट, रबाडा

हवामान: पहाटे वादळ येण्याची शक्यता

भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, रविंद्र  जडेजा, वॉशींग्टन सुंदर दीपक चाहर, राहुल चाहर, खलील अहमद, नवदीप सेनी

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डिकॉक, टेन्ड बाऊमा, बेरन हेन्ड्रिक्स, डेविड मिलर, रिझा हेन्ड्रिक्स, रुसी वेन्डर डू सेन, आंद्रे पीटलूकवयो, द्वेन

प्रिटोरियस, अँड्रीच नॉर्टीजे, बिजोन फोर्तुन, जॉर्ज लिंड ताईबाईझ शम्सी.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!