Type to search

Featured नाशिक

पथनाट्याद्वारे भाजपने मांडला कामगिरीचा लेखाजोखा

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात उद्या होणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंचवटी कारंजा परिसरात आज सायंकाळी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे पथनाट्याच्या माध्यमातून मांडण्यात आली.

पथनाट्याच्या समूहाने विविध पोवाडे सादर करत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना जनते समोर सादर केल्या. यामध्ये प्रामुख्याने उज्ज्वला योजना, प्रधान मंत्री आवास योजनांचा समावेश होता. पथकाद्वारे महाराष्ट्रात लागू केलेले आरक्षण, डिजिटलायझनेशन विषयी माहिती देण्यात आली. तसेच विरोधीपक्षाचा कसून समाचार देखील घेण्यात आला.

उद्या होणारया मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेस आणि परवा होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला येण्याचे आवाहन ह्या वेळी पथकाद्वारे करण्यात आले.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून पथनाट्याद्वारे जनजागृती केली जात असून पुणे येथील समूहाकडून भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या एक दिवस आधी समारोप स्थळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!