Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

धक्कादायक: सात वर्षीय बालिकेवर अत्याचार; नराधमास अटक

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी

हैदराबाद, उन्नाव येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर येथे सात वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान परिसरातील नागरिकांनी आरोपी पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महालक्ष्मी नगर, अंबड येथे काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह रहायला आले होते. याठिकाणी आधीच रहात असलेल्या कैलास रामू कोकणी (27) याने कुटूंंबातील 7 वर्षीय मुलीला खेळण्याच्या निमित्ताने शेजारील घरमालकाच्या घरावरील गच्चीत नेलें. काही वेळाने कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून तिला तो रहात असलेल्या खोलीत घेऊन गेला. त्याच्या घरात अन्य कुणीही नसतांना त्याने दरवाजा आतून बंद करून बलिकेवर बळजबरीने अत्याचार केला. काही वेळातच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

त्याचवेळी जवळच असलेल्या संशयिताला विचारण्यासाठी आईने हाक मारली असता संशयिताने घाबरून बराचवेळ दरवाजा उघडला नाही. यावेळी शेजार्‍यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले असता बलिकेच्या अंगावर कपडे नसल्याचे आढळून आले. भेदरलेल्या मुलीने आईला माहिती दिल्यावर घडलेला प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, घडलेली घटना पीडित मुलीने तिच्या आईवडिलांना सांगितली असता आई वडिलांनी परिसरातील नगरसेवक दीपक दातीर यांना सदर प्रकरणाबद्दल सांगितले. दरम्यान दातीर यांच्यासह योगेश वीर, मदन यादव, रत्नदीप कोरी, किरण चौधरी, राजेश जयस्वाल, मनीषा यादव, अवनीश यादव, सुदर्शन वेताळ नवनाथ शिंदे यांनी सदर संशयित कैलास कोकणी यास पकडून चांगला चोप दिला व त्याला अंबड पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी पुढील तपास व.पो.नि. कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!