Type to search

Breaking News Featured टेक्नोदूत मुख्य बातम्या

तिसऱ्या वाढदिवशी जिओचा धमाका; गिगाफायबर पुढील महिन्यात ग्राहकांच्या सेवेत

Share

मुंबई | वृत्तसंस्था

रिलायन्सच्या इंडस्ट्रीजने ४२व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मोठ्या घोषणा केल्या आहेत. रिलायन्सच्या इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश यांनी कंपनीच्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. रिलायन्स जिओने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Reliance jio GigaFiber या बहुप्रतीक्षित ब्रॉडबँड सेवेसोबत प्रतीक्षा संपली आहे. येत्या 05 सप्टेंबरपासून Reliance Jio GigaFiber लाँच होणार असून 700 रुपयांपासून हे प्लँन सुरु होणार आहे. जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु होती. पाच लाख घरांमध्ये सध्या या सेवेचा वापर केला जात आहे. 100 जीबी पेक्षा जास्त डेटा यामध्ये वापरला जात आहे. यासोबत लँडलाइन सेवाही दिली जाणार आहे. Jio GigaFiberच्या माध्यमातून एक जीबी पर सेकंड स्पीड, फोन, सेट टाँप बॉक्स व अनेक स्मार्ट डिजिटल सोल्युशन्स देण्यात येणार आहे.

रिलायन्सकडून जिओ सेटअप बॉक्सची देखील घोषणा करण्यात आली आहे. तुम्ही जगामध्ये कुठेही बसून मित्रांसोबत गेम खेळू शकणार आहात. जिओ सेटअप बॉक्स सेवेमुळे आता एअरटेल, टाटा स्काय सारख्या कंपन्यांसमोर मोठी स्पर्धा उभी राहणार आहे. रिलायन्स ‘फस्ट डे फस्ट शो’ची घोषणा केली आहे. ज्यामध्ये सिनेमागृहात लागलेला चित्रपट ‘फस्ट डे फस्ट शो घरूनच बघता येणार आहे. पुढीलवर्षी म्हणजेच जून 2020पर्यंत हि सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओ आणखी काही अनोख्या गोष्टी बाजारात आणणार आहे. बऱ्याचदा आपल्याला ऑनलाइन खरेदी करताना कपड्यांचा अंदाज येत नाही. मात्र, आता एमआर (MR) नावाचा डिव्हाईस बाजारात अनंत आहे. एमआर डिव्हाईसमुळे ऑनलाइन कपडे परिधान करू कसे दिसतात ते बघता येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!