Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आश्चर्यजनक! चित्रपट पाहायचा अन चंदन चोरायचे; चोरटा अलगद पोलीसांच्या जाळ्यात

Share

नाशिक । प्रतिनिधी

थियटरमध्ये रात्री 9 ते 12 चा चित्रपट पाहायचा अन नंतर चंदानाचे झाड चोरायच्या कामगिरीवर निघायचे असा दिनक्रम असणाते चंदन चोरटे सातपूरला झाडाचा उर्वरीत लाकुड घेण्यासाठी पुन्हा गेले अन अलगद नागरीक तसेच पोलीसांच्या सापळ्यात अडकल्याचा प्रकार सातपूर परिसरातील अशोकनगर येथे घडला.

असिफखा शरिफखा पठाण (34, रा. कटोरा बाजार, ता. भेकरदन, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकनगर येथे गुरूवारी (दि.14) रात्री पुरूषोत्तम सोमनाथ लोखंडे यांच्या दरवाजातील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी तोडले. मात्र हे झाड दुसर्‍या घराच्या प्रवेश द्वारावर पडून आवाज झाल्याने तेथील नागरीक जागे झाले.

यामुळे चोरट्यांनी बुंधा तसाच टाकून पळ काढला. याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणी करून चोरटे किंमती बुंधा चोरण्यासाठी पुन्हा येतील असा अंदाज बांधून तेथे नागरीकांच्या मदतीने चार दिवस सापळा लावला होता. दरम्यान सोमवारी (दि.18) रात्री तीन चोरट्यांनी पुन्हा उर्वरीत बुंथा तोडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सावध असलेल्या लक्ष्मीबाई त्र्यंबक काकड व रामा हरिभाऊ प्रधान या नागरीकांनी आरडाओरड करत चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. याची माहिती मिळताच पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून एकास जेरबंद केले. इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

पकडण्यात आलेल्या असिफखा पठाण याच्याकडे कसून चौकशी केली असता. त्यांची ही पहिलीच चोरी असल्याची कबुली त्याने दिली. तसेच त्याचे मित्र आणि तो दिवसभर चंदनाच्या झाडांची रेकी केल्यानंतर रात्री 9 ते 12 असा थिएटरमध्ये चित्रपट पाहून नंंतर चंदनाचे झाड तोडण्यासाठी जात असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या नागरीकांचा सत्कार

या चंदनचोरीच्या गुन्ह्यासह विविध गुन्ह्यांमध्ये शहर पोलीसांना मदत करणार्‍या पोलीस मित्र नागरीकांचा सत्कार आज पोलीस आुयक्त नांगरे पाटील यांच्या हस्ते झाला. यामध्ये लक्ष्मीबाई त्र्यंबक काकड, रामा हरिभाऊ प्रधान, हेमंत देशपांडे, अमोल शेळके, अमोल भालेराव, ललीता भावसार, निंबा भांबरे, उन्मेश कुलकर्णी, सुशराज आचारी, रवी मोरे, प्रमोद त्रिभुवन, राजुल आचारी, गोपाल कुमावत यांचा सामावेश आहे.

पोलीस कुटुंबियांना विमा धनादेश वाटप

शहरात मागील काही महिन्यांमध्ये विविध घटनात 3 पोलीस कर्मचार्‍यांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाला होता. पोलीस कल्याण विभागाने विमा कंपनीकडे पाठपुराव करून मिळालेल्या प्रत्येकी 10 लाख रूपयांचे धनादेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले हे धनादेश पोलीस पत्नी ज्योती भास्कर दिघे, मंगल बबन तिडके, सुगंधा किशोर जाधव यांनी स्विकारले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!