Type to search

Featured नाशिक

पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू

Share

लोहोणेर | वार्ताहर

येथील खालची भिलाटी येथील रहिवाशी रामचंद्र (छोटू) तुळशीराम पवार (वय ३५) हा इसम शनिवारी दुपारी येथील बंधाऱ्या कडे गेला असता अचानक त्याचा तोल गेल्याने पाय घसरून गिरणा नदीवरील उजव्या कॅनॉल मध्ये पडल्याने मृत पावला आहे. येथील काही युवकांनी त्याला कॅनॉलच्या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले होते. देवळा येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेत त्यांचे निधन झाले.

देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन केल्या नंतर त्याचेवर काल सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याचे पशाच्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी देवळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक खंडेराव रदवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!