Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

आता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक

Share
दहा वर्षात १२५ कोटी आधारनोंदणी, 125 crore adhar card registration completed in last ten years

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

कायदा मंत्रालयाकडे मतदान कार्ड आणि आधार जोडणीची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असल्यामुळे आता आधारला मतदान ओळखपत्रही जोडण्यात येणार आहे. यासंदर्भात आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र लिहिले असून मतदान ओळखपत्रही आधार कार्डशी जोडल्यास बोगस मतदानाला रोखता येण्यास असे आयोगाने म्हटले आहे.

आयोग अनेक वर्षांपासून बोगस मतदानाला आळा घालून ‘एक व्यक्ती एक मत’ योग्य राबवायचे असेल तर मतदान कार्ड आधारला जोडणे आवश्यक असल्याची मागणी करीत आहे. निवडणूक आयोगाने आता पुन्हा एकदा कायदा मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. आयोगाने त्याचबरोबर ‘लोकप्रतिनिधी कायदा- १९५०’मध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.

आयोगाने याआधी देखील मतदान कार्ड आणि आधार जोडणी वैकल्पिक असल्याचे सांगितले होते. परंतु, ए. के. जोती यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयोगाच्या समितीने आपली भूमिका बदलली होती. त्यानंतर आतापर्यंत ३२ कोटी आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी जोडण्यात आले आहेत.

फेब्रुवारी २०१५ मध्ये आधार कार्ड आणि मतदान कार्ड जोडणीविषयी मार्गदर्शक तत्वे आयोगाच्या मतदान समितीने जारी केली होती. हा राष्ट्रीय मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाचाच एक भाग होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर यावर बंदी घातली. शासकीय सेवांचे लाभ आणि धान्य वितरण, गॅस अनुदान वितरणाशिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी आधार जोडणी करता येणार नसल्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, मतदारांच्या माहिती तपशीलाच्या जुळवणीसाठी आधारची माहिती देण्याची मागणी आयोगाने जुलै २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे केली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!