Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo: नाशिकला ‘लिव्हेबल सिटी’चा लौकीक मिळवून द्यावा-माने; क्रेडाईच्या ‘शेल्टर प्रॉपर्टी एक्सो’चा शानदार...

Video: नाशिकला ‘लिव्हेबल सिटी’चा लौकीक मिळवून द्यावा-माने; क्रेडाईच्या ‘शेल्टर प्रॉपर्टी एक्सो’चा शानदार शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी

शहराच्या विकासात शिक्षण,पर्यटन, वैद्यकिय सेवांसह विविध सुविधांच्या पूर्ततेचे असावे. शहराची भौगोलिक स्थिती चांगली आहे. जमिनींचे विवादही कमी व प्रामाणिक आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात शहराच्या विकासात नोड सिस्टीम, सेक्टोरीयल पध्दत, फार्म हाऊस प्रणाली सारख्या नवनवीन संकल्पना राबवून शहर ‘लिव्हेबल सिटी’ म्हणून लौकीक मिळवून देण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागिय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी केले.

- Advertisement -

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शेल्टर प्रॉपर्टी एक्सो’ प्रदर्शनाचा शुभारंभात विभागिय महसूल आयुक्त श्री माने बोलत होते.यावेळी व्यासपिठावर मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, क्रेडाईचे राष्ट्रीय खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाईचे राज्य सचिव सुनिल कोतवाल, स्किल डेव्हलपमेंट चे समन्वयक जितूभाई ठक्कर, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, शेल्टरचे समन्वयक रवी महाजन, सेक्रेटरी कृणाल पाटील, मुख्य प्रायोजक निखील रुंग्ठा हे होते. मान्यवरांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलनाद्वारे प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना श्री माने यांनी शहरातील जीवनमान गुणवत्तपूर्ण असल्याचा निर्वाळा दिला. येणार्‍या काळात 60 वर्ष वय असणारे 35 टक्के जनसंख्या राहणार आहे. त्याचा विचार करुनच विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी पाोलिस आयुक्तांनी शहराच्या नैसर्गिक व भौगोलिक प्रणालीचे कौतूक करताना शहराच्या लगतच्या सततच्या वर्दळींच्या भागांना कमिशनरेटमध्ये आणण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले.सातत्याने गर्दी राहणार्‍या व ग्रामिण पोलिस हद्दीत येणार्‍या त्र्यंबकेश्वर, वाडीव्हरे, सुलावार्सन्स, ओझर या भागांना कमिशनर हद्दीत आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. या माध्यमातून शहराच्या गुन्हेगारीवर जास्त लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याचे पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी सांगितले. शहरात असलेल्या 135 झोपडपट्यांचे प्रश्न वेगळे असून, सद्या रस्त्यावर असलेल्या 29 हजार रिक्षांपैकी 35 टक्के रिक्षा या स्क्रॅपच्या लायक असल्याचे सांगितले. समन्वय व संवादाच्या माध्यमातून शहरातील क्राईम कमी करुन शहर शांत व सूंदर करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगितले. यात प्रामुख्याने 13 पोलिस ठाण्यांचे 65 चौक्यांच्या माध्यमातून विभागीकरण करण्यात आले. क्यूआर कोड, इलेक्ट्रॉनिक सिव्हीलन्स खाली शहर आणले असल्याचे सांगितले.

यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या मात्र प्रलंबीत असलेल्या युनिव्हर्सल टीडीआरचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबीत असून याबाबत ना. नितीन गडकरी यांच्याशी चर्चाही केली असल्याचे सांगितलेे. या माद्यमातून टीडीआरचा वापर राज्यात कोठेही करता येणार असल्याने टीडीआरच्या माध्यमातून मनपाला आरक्षीत भूखंड ताब्यात घेणे शक्य होणार असल्याचे सांगितले. युनिफाईड डिसीआरचाही अवलंब केला जाणार आहे. 1 जानेवारी पासून घरपट्टीची आकारणी ऑनलाईन पध्दतीने केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरीकांना हेलपाटे मारण्याची गरज राहणार नसल्याचे सांगितले. मनपाच्या 16 सेवा या ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. भविष्यातील 40 वर्षाच्या शहराच्या पाण्याचा प्रश्न मुकणे धरणामुळे सोडवण्यात यश मिळाले असून याठिकाणाहुन पाणी पूरवठा सूरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या सूरूवातीला उमेश वानखेडे यांनी प्रास्ताविकात शेल्टर प्रदर्शनाला 18 वर्षांची जूनी परंपरा असल्याचे सांगून या माध्यमातून 15 लाक ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्याघरांच्या माध्यमातून समाजातिल सर्वच स्तराच्या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.शहरात घरे बांधतानाच पर्यटन, शिक्षण, कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडाई विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. व्यवसायीकांना भेडसावणार्‍या प्रश्नांमध्ये घरपट्टीबाबत खूप अडचणी असल्याचे सांगून यावर लक्ष देण्याचे आवाहन केले.
यावेळी रवी महाजन यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

या प्रदर्शनात विविध डोमच्या माध्यमातून शहर परिसरातील 100 बांधकाम व्यवसायीकांनी सहभाग नोंदवल्याचे सांगितले. त्या सोबतच 15 पतपूरवठा करणार्‍या संस्था, 55 बांधकामाशी सलग्न साहीत्या पूरवणार्‍या व्यवसायीकांचे स्टॉल्स उभारण्यात आले असल्याचे सांगितले. क्रेडाई नाशिकच्या वतीने शहराची सविस्तर माहीती देणारी चित्रफित तयार करण्यात आली असून या माध्यमातून स्मार्ट सिटी, औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी सह पर्यटन शिक्षण, कृषी या शहराच्या बलस्तानांना जगासमोर आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, राज्य शासनाच्या नगररचना विभागाच्या उपसंचालक प्रतिभा भदाणे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांचाही क्रेडाईतर्फे सत्कार करण्यात आला. क्रेडाई नाशिकतर्फे तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल प्लॅनर बूकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भूषण मतकरी यांनी तर आभार कृणाल पाटील यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टॉल्सची आकर्षक मांडणी

प्रदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या डोमच्या रचनेसोबतच व्यवसायीकांनी उभारलेल्या स्टॉल्समुले प्रदर्शनाला वेगळी झळाली लाभलेली आहे. सुरेख रंगसंगती आकर्षक मांडणीमुळेे ग्राहकांचे चित्तवेधक ठरणार आहे.

सर्वच स्तरातील लोकांना उपयुक्त

या प्रदर्शनात मध्यमवर्गीयांची गरज लक्षात घेउन त्यांना उपयुक्त ठरेल अश्या दरातील प्रकल्पांचाही समावेश असल्याने समाजातील सर्वच स्तरांना न्याय देण्याचा प्रयत्न राहीला असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या