Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात नव्याने ६ कोरोना संशयित रुग्ण दाखल; मरकजला गेलेल्या दोघांचा सामावेश

जिल्ह्यात नव्याने ६ कोरोना संशयित रुग्ण दाखल; मरकजला गेलेल्या दोघांचा सामावेश

नाशिक : जिल्ह्यात ६ नवे कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये दिल्ली येथे मरकज कार्यक्रमासाठी गेलेल्या दोघांचा सामावेश आहे. जिल्ह्यात एकुण ४‍१ संशयितांवर उपचार सुरू आहेत. पैकी ३९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात दाखल झालेल्या पैकी ३ जण जिल्हा रुग्णालयात तर ३ मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. आत्तापर्यंत ‍१४४ पैकी १०४ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारपासून (दि.३१) तीन रुग्णालयांमध्ये ४१ कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. गुरुवारी (दि.२) शहरातील जिल्हा रुग्णालय व मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात तीन संशयित दाखल झाले आहेत.

- Advertisement -

परदेशातून आलेल्या किंवा कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना घरात किंवा शासकीय जागेत क्वारंटाइन केले जात आहे. मंगळवार ते गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ४१ संशयितांना दाखल केले आहे. त्यांचा अहवाल गुरुवारी (दि.२) रात्री किंवा शुक्रवारी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात परदेशातून ७८२ नागरिक आले असून त्यापैकी २९५ नागरिकांची १४ दिवस नियमीत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर ४८७ नागरिकांची नियमीत तपासणी सुरु आहे. गुरुवारी परदेशातून ८५ नागरिक जिल्ह्यात आले आहेत.

कोरोना रुग्णात सुधारणा
निफाड तालुक्यातील लासलगाव येथे ३० वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती तंदुरुस्त असुन त्यात अधिक सुधारणा होत असल्याचे वैदकिय अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या