Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुथुटमधील दरोडेखोरांवर मोक्का; 12 जणांचा सामावेश, शहर पोलीसांची कारवाई

Share

नाशिक । प्रतिनिधी

मुथुट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणार्‍या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीवर तसेच त्यांंना मदत करणार्‍यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेागारी प्रतिबंधक कायदा ( मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. या संशयितांनी संघटीतपणे दरोडा टाकून कार्यालयातील कर्मचार्‍यास पिस्तुलातून गोळ्या झाडून खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

जितेंद्रसिंग विजयबहाद्दुर राजपूत (34, रा. दिंडोली, सुरत, गुजरात, मूळ-मछलीशहर, जि, जौहानपूर, उत्तरप्रदेश), परमेंदर सिंग (उत्तरप्रदेश) आणि आकाशसिंग राजपूत (रा. सुरत, गुजरात) या कुख्यात संशयितांचासह अजून आठ जणांचा या गुन्ह्यात सामावेश आहे. उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवरमधील मुथुट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणारर्‍या दरोडेखोरांसह मुख्य सुत्रधार व दरोडेखोरांना मदत करणार्‍यांवर मोक्का लावण्यात आला आहे.

मुथुट फायनान्सच्या उंटवाडी रोडवरील कार्यालयात 14 जुन रोजी सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. मात्र कार्यालयातील धाडसी कर्मचारी साजु सॅम्युअल याने केलेल्या विरोधामुळे दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. मात्र दरोडेखोरांनी साजुला सॅम्युअलला गोळ्या झाडून त्याचा खून केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

शहर पोलिसांनी तपास करून गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश राज्यातून जितेंद्रसिंग विजय बहादुर सिंग राजपूत परमेंदर उर्फ गौरवसिंग राजेंद्र सिंह आकाशसिंग विजय बहादुर सिंग राजपुत यांना अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून दरोड्यातील मुख्य सुत्रधार सुबोधसिंह ईश्वरीप्रसाद सिंह (35, रा. बिहार) हा असल्याचे उघड झाले. सुबोधसिंह सध्या बिहार येथील कारागृहात आहे. तसेच इतर आठ संशयितांचीही नावे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.

दरोडेखोरांनी पुर्वनियोजन करून संघटीतपणे हा दरोडा टाकल्याचे उघडकीस आल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आरोपींविरोधात मोक्का नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून संशयित दरोडेखोर व त्यांना मदत करणार्यांवर मोक्का नुसार कारवाई केली आहे. मोक्का गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख हे करीत आहेत.

आतंरराज्य टोळ्यांना बसेल वचक

या टोळीने यापूर्वी उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दरोडे टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर सदर टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानुसार या प्रस्तावावर काम करण्यात येऊन मोक्का कलमाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे अटक करण्यात आलेल्या संशयितांना जामीन मिळणे सहज शक्य होणार नाही. तसेच, बिहार जेलमध्ये बंद असलेल्या सुबोधसिंगला नाशिकला आणणे सोपे होणार आहे. यामुळे आंतरराज्य टोळ्यांना वचक बसेल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!