Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आयशर-मोटारसायकल अपघातात दोघी ठार

Share
A 56-year-old passenger died on Thursday while six others sustained injuries after their bus was hit by a truck near Tawade Hotel on Pune-Bengaluru National Highway on Thursday. The victim was identified as teacher Uddhav Sadashiv Patil, a resident of Peth Vadgaon city of this district, said police.

नांदगाव । प्रतिनिधी

नांदगाव-मनमाड रस्त्यावर असणाऱ्या हिसवळ शिवारात आयशर व मोटारसायकल समोरा समोर धडक झाली. या अपघातात पत्नी-मुलगी ठार तर मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोघा मयतावर आज रोजी दफनविधी करण्यात आला असून नांदगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी दु:खत घटना घडली. कालच दोघा मित्रांना जलसमाधी मिळाली होती.
मोटारसायकल व आयशरच्या अपघातात इकबाल सुलतान खान (रा. नांदगाव) हे पत्नी आफसाना (३०) मुलगी (१०) जोया यांच्यासह मोटारसायकल (क्र. एम. एच. १५ ए. व्ही. ५२९३) हे मनमाडकडून सकाळी ११:०० वाजता येत असताना नांदगावहून हिसवळ शिवारात आयशर ( क्र. एम. एच. १५ एफ. व्ही. ७७९३) समोरून येणाऱ्या मोटारसायकल जोरदार धडक दिली.
यात जोयाचा जागीच मृत्यू झाला तर आफसाना हिला पुढील उपचारासाठी मनमाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच निधन झाले. इकबालला गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. अपघातानंतर आयशर चालकाने घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!