Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळ झालेल्या अपघात एक ठार, दोन जखमी

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील रहिवासी असलेले चौघे युवक पंचवटी येथून आपापल्या गाव, पाड्यांवर दुचाकीने जात होते. यावेळी दिंडोरीकडून भरधाव नाशिककडे येणाऱ्या पिकअप जीपने यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अलीकडे गुरुवारी (दि.12) रात्री 9 वाजेच्या सुमारास घडला. अपघातात एक दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला तर तिघे तरुण गंभीरपणे जखमी झाले.

याबाबत म्हसरूळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द, वळखेड, निळवंडी, पाडा येथिल रहिवासी असलेले विशाल संजय गोडे, अनिकेत रामभाऊ माळेकर, वैभव वायकांडे, सचिन सुरेश सताळे (24) हे चौघे दिंडोरीच्या दिशेने दुचाकी ने (एमएच15 ई डी 6454) जात होते. यावेळी समोरून ओव्हरटेक करत पिकअप जीप (एमच41 जी 2942) भरधाव वेगाने आल्याने हे भांबावून गेले व जीप ने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हे चौघे लांब अंतरावर फेकले गेले.

सताळे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच गोडे, माळेकर, वायकांडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एक टेम्पोत तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातप्रकरणी पिकअप जीपचालक समाधान उल्हास भीरे (रा. दिंडोरी) यास म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!