Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मंदीचा फटका; महिंद्राने कामावरून काढले १५०० कर्मचारी

Share

मुंबई | वृत्तसंस्था

भारतात मंदीचे पडसाद दिसू लागले आहेत. मंदीचा सर्वाधिक फटका भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये एकच खळबऴ उडाली आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकार नुकसान टाळण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करत आहे. मारुती सुझुकी, अशोक लेलँडने आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यात अधिक भर महिंद्राने घातली आहे.

सर्वाधिक ऑटोमोबाईल सेक्टर मधील जोडधंद्यांमध्ये सुमारे ५ लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहे. नुकतेच जमशेदपूरमध्ये टाटा मोटर्सने आपले उत्पादन घटविले आहे. यामुळे या कंपनीला स्पेअर पार्ट पुरवठा करणाऱ्या ३० कंपन्यां बंद पडण्याचा मार्गावर आहे. अशीच काहीशी परिस्थिती इन्शुरन्स, सेवा आदी क्षेत्रान मध्ये देखील निर्माण झाली आहे.

सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने कर्मचारी कपात सुरू केली आहे. व्यवस्थापकीय संचालक पवन गोएंका यांनी कोलंबोमध्ये सांगितले की, कंपनीने १ एप्रिलपासून जवळपास १५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एवढे करूनही जर मंदी सुरूच राहिली तर आणखी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांपेक्षा डीलर आणि सप्लायरच्या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याचा जास्त धोका आहे.भारतातील पुढील उत्सवी सिझन वाहन उद्योगासाठी खूप महत्वाचा आहे. अन्यथा याचा नकारात्मक परिणाम नोकरी आणि गुंतवणुकीवर होणार असल्याचा इशारा गोएंका यांनी दिला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!